साईनगरी शिर्डी : माहिती , इतिहास , महत्व ; असे पोहोचा साई दरबारी ; देवस्थानाविषयी सविस्तर माहिती

378 0

अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९ च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.

शिर्डीला साईनगर देखील म्हणतात. शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते. हे शहर वेस्टर्न सीशोर लाइन (अहमदनगर – मनमाड रोड) या व्यस्त मार्गाच्या पूर्वेस १८५ कि.मी. आहे, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील संत श्री साईबाबा यांचे घर म्हणून शिर्डी प्रख्यात आहेत. शिर्डी येथे स्थित श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही सर्वात श्रीमंत मंदिर आहे.

असे पोहोचू शकता शिर्डीपर्यंत : 

२०११ पर्यंत शिर्डीत चेन्नई, मुंबई, विशाखापट्टणम, काकीनाडा, हैदराबाद म्हैसूर व इतर शहरांमध्ये राज्यांत शिर्डी रेल्वे स्थानक टर्मिनल थांबे म्हणून आहे. १ ऑक्टोबर २०१७ रोजी शिर्डी विमानतळाचे उद्घाटन भारताचे अध्यक्ष श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. शिर्डी विमानतळापासून तीन विमाने निघतात, एक दिल्ली , हैदराबाद आणि दुसरे मुंबई . शिर्डीच्या दक्षिण-पश्चिमेस १४ कि.मी. अंतरावर काकडी (कोपरगाव तालुका) येथे विमानतळ हे आहे. परंतु मूळ योजनांनुसार बांधकाम फेब्रुवारी २०१६ मध्ये पूर्ण झाले , आणि पहिल्या ट्रायल फ्लाइटने २ मार्च २०१६ ला उतरविले. धावपट्टी २२०० मीटर ते ३२०० मीटर पर्यंत वाढवण्याची योजना आहे. लक्ष्यपूर्तीची तारीख २०१७ किंवा २०१८ आहे. शिर्डीपासून अनुक्रमे औरंगाबाद आणि पुणे येथे सर्वात महत्त्वाची विमानतळ आहेत.

शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी.आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले आहे. शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी बहुतेक गाड्या आहेत. शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी.आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे. कोपरगावपासून शिर्डी केवळ १५ कि.मी. आहे. श्रीरामपूर पासून शिर्डीचे अंतर साधारणपणे ३५ कि.मी.आहे.

शिर्डीत आता साईनगर शिर्डी नावाचे एक नवीन रेल्वे स्थानक आहे, जे मार्च २००९ मध्ये कार्यरत झाले.

इतिहास : 

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. असे सांगितले जाते कि , साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत होते . व त्यानंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ.स. १९१८ रोजी साईबाबांनी समाधी घेतली.

साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.दिवसेंदिवस भाविकांची संख्येत वाढ होत आहे.

आयुष्यभर फकिराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे़. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.

शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज २०१९ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत़.

Share This News

Related Post

Krupal Tumane

ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार; खासदार कृपाल तुमाने यांचा गौप्यस्फोट

Posted by - May 25, 2023 0
नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे 13 खासदार निवडून येणार नाहीत, असा…
Hingoli News

Hingoli News : दोघां भावांच्या मृत्यूने हिंगोली हळहळलं ! जिवंतपणी हातात हात घालून फिरले; मरतानादेखील एकमेकांची साथ नाही सोडली

Posted by - October 22, 2023 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये असलेल्या शेवाळा या ठिकाणी 5…

भाजपच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड, शिवसेनेचे तोडफोड केल्याचा भाजपचा आरोप

Posted by - April 19, 2022 0
मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोलखोल अभियान पोलखोल रथ तयार करण्यात…

मुंबई : आपत्ती व्यवस्थापन संचालकपदासाठी अधिकारी मिळेना; 7 महिन्यांपासून पद रिक्त

Posted by - July 12, 2022 0
मुंबई: राज्यातील कोणत्याही विभागात, जिल्हयात कसलीही आपत्ती आली तर त्या ठिकाणी तातड़ीने मदत पोहचिण्याचे, त्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे काम…

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक ; भाजपच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Posted by - March 9, 2022 0
राज्याचा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *