जातीला समाज म्हणू नका – हेरंब कुलकर्णी

2781 0

आरक्षण विषयावर सर्व जाती आक्रमक होताना सध्या अनेक जण आपल्या जातीचा उल्लेख आमचा समाज असा करत असतात.आमच्या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे बोलत असतात..माध्यमे ही हमखास प्रत्येक जातीला समाज म्हणतात.. आम्ही विशिष्ट जातीचे असे म्हणताना लाज वाटते त्यामुळे जातीला लोक समाज म्हणतात…

हे आपण नोंदवू या की
जातीला समाज म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. अनेक शतकांतील समाजसुधारक आणि स्वातंत्र्य आंदोलनाने त्याग व संघर्ष करून आपण टोळीपासून समाजापर्यंत प्रवास केला आहे… सर्व जाती धर्म मिळून जात निरपेक्ष धर्मनिरपेक्ष जो बनतो त्या समूहाला आपण समाज हे नाव दिले आहे. जर जातींनाच आपण समाज म्हणणार असू तर मग सर्व जातींनी मिळून बनलेल्या समाजाला काय नाव द्यायचे हा प्रश्न आहे ?

जातीला ‘समाज’ असे म्हणून जातीच्या संकुचितपणाला प्रतिष्ठा देण्याचा एक सुप्त प्रयत्नही यात असतो. जात ही अत्यंत क्षुद्र व प्रतिगामी गोष्ट आहे व माणसांचा जातीचा चेहरा नसलेला समाज निर्माण करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केलेले आहेत. जातींची बंधने गळून पडतात त्यातून समाज नावाची एकसंघ वाटणारी भावावस्था आपली बनते.

तेव्हा जातींचे उल्लेख जात म्हणूनच करून त्याच्या संकुचितपणाचे जाणीव करून द्यायला हवी त्याचे समाज म्हणून अजिबात उदात्तीकरण होता कामा नये…. समाज ही उन्नत स्थिती आहे

संविधानाने आपल्याला वेगवेगळी संस्थाने, राज्य, जात धर्म ओलांडून एक भारतीय म्हणून ओळख दिली आहे.एकसंघ समाज बनवले आहे. ती आपण टिकवली पाहिजे. हे वस्त्र टिकायला हवे. त्यामुळे जातीचे समाज म्हणून उदात्तीकरण करू नका.
माध्यमांनीही जातीचा उल्लेख समाज म्हणून करू नये.

हेरंब कुलकर्णी

– सामाजिक कार्यकर्ते

Share This News

Related Post

Rajnikant

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून दोघांना जबर मारहाण

Posted by - August 11, 2023 0
दिग्गज अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांचा जेलर चित्रपट गुरुवारी (10 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची दाक्षिणात्य राज्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला…
arnold dix

Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?

Posted by - November 29, 2023 0
उत्तराखंड : दोन आठवड्यांपासून उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात (Uttarakhand Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या मजुरांची…

बियरप्रेमींसाठी खास बातमी ! घराच्या घरी बनावट येणार बियर, जर्मनीमध्ये तयार झाली खास पावडर, फक्त २ चमचे आणि तयार…

Posted by - March 25, 2023 0
बियरच्या शौकीनांना उन्हाळा सुरु झाला कि तल्लफ लागते ती बियरची… तशी बियर तुम्हाला सहज उपलब्ध होते. पण जर तुम्हाला सांगितले…

भारताच्या शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी पाणबुडी INS वागशीर आहे तरी कशी ?

Posted by - April 16, 2022 0
नवी दिल्ली- भारताच्या शत्रूंची झोप उडवण्यासाठी देशाची सागरी सीमा अभेद्य आणि अखंड ठेवणारी आतापर्यंतची सर्वात आधुनिक पाणबुडी INS वागशीर लवकरच…

महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद : INS विक्रांतचे आज जलावतरण ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ध्वजाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

Posted by - September 2, 2022 0
केरळ : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांत या महाकाय जहाजाचे जलावतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *