‘खेडवळ’ लूकमध्ये झळकणार अभिनेत्री स्मिता तांबे

481 0

नवनवीन भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. स्मिता आगामी ‘लगन’ या मराठी चित्रपटात आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. या आधी स्मिताने चित्रपट, मालिका, वेब सीरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

जी. बी. एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा चित्रपट 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधा असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. खेड्यात राहणारी ऊसतोडणी कामगाराची भूमिका स्मिताने या चित्रपटात साकारली आहे. “चित्रपटात ही वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली याचा मला आनंद वाटतो आणि समाधानही वाटते,” अशी प्रतिक्रिया स्मिताने कळवली आहे. दिग्दर्शक अर्जुन गुजर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

करारी, कणखर तरीही सोज्वळ अशा छटा या व्यक्तिरेखेला आहेत. स्मिता या चित्रपटात खेडवळ लूक दिसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Veteran Artists Pass Away In 2023

Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Posted by - December 31, 2023 0
मुंबई : 2023 हे वर्ष मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणात निराशाजनक गेले आहे.अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. यामध्ये…

राष्ट्रवादी पिंपरी विधान सभेच्या कार्याध्यक्षपदी इखलास सय्यद यांची नियुक्ती

Posted by - June 8, 2022 0
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या पिंपरी विधानसभेच्या कार्याध्यक्ष पदी इखलास सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष…

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बीएमसी महाविद्यालयात उद्योजकता विकास विभागाची स्थापना

Posted by - March 9, 2022 0
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात उद्योजकता विकास विभागाची स्थापना करण्यात आली. उद्योजक इंद्रनील चितळे यांच्या हस्ते या विभागाची…

PHOTO : अक्षय कुमारने घेतला पुण्यातील मिसळीचा आस्वाद ; INSTA वर फोटो शेअर करून म्हणाला ,खूप छान….

Posted by - August 6, 2022 0
पुणे : पुण्याची मिसळ म्हणजे पुणेकरांचा अगदी जीव कि प्राणच आहे. या पुणेरी मिसळीचे महाराष्ट्रभरात चहाते तर आहेतच… पुण्यामध्ये नुकताच…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आता ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’ ; पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आणि विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

Posted by - April 4, 2022 0
नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता एक नवीन व्यासपीठ घेऊन आले आहे. ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *