स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असेल तर या टिप्स फॉलो करा

329 0

सोशल मीडिया, चॅट, कॉलिंग यामुळे स्मार्टफोनचा वापर खूप केला जातो. साहजिकच फोनची बॅटरी लवकर संपते. त्यासाठी काही सोपे उपाय केल्यास बॅटरी जास्तवेळ टिकते आणि तिचे आयुष्य देखील वाढते.

फोनची बॅटरी कमीत कमी एक दिवस टिकणे गरजेचे आहे. ती लवकर संपत असल्यास आपल्या वापरामध्ये काही त्रुटी आहेत हे लक्षात घ्यावे. अनेकदा प्रवासात असताना फोनची बॅटरी संपल्यामुळे तुमची मोठी अडचण होते. अशा वेळी खालील उपाय केल्यास बॅटरी जास्त वेळ टिकते-

रिफ्रेश रेट करा सेट

स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये काही बदल करावे लागतील. फोनची बॅटरी लवकर समाप्त होण्याचे कारण डिव्हाइसचा जास्त वेळ वापर करणे हे देखील आहे. रिफ्रेश रेट जेवढा जास्त असेल, तेवढ्या लवकर फोनची बॅटरी समाप्त होईल. फोनच्या सेटिंग्समध्ये दिलेल्या रिफ्रेश रेटला तुमच्या सोयीनुसार ६० हर्ट्ज आणि ९० हर्ट्जवर सेट केल्यास फोनची बॅटरी लवकर समाप्त होणार नाही.

जास्त बॅटरी वापरणारे अ‍ॅप्स अन इन्स्टॉल करा

फोनची बॅटरी लाइफ वाढवण्याची आणखी एक सोपी पद्धत आहे. यासाठी फोनमधील कोणते अ‍ॅप्स सर्वाधिक बॅटरीचा वापर करतात, ते पाहा. तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये गेल्यावर बॅटरी सेक्शनमध्ये याची माहिती मिळेल. येथे कोणते अ‍ॅप्स सर्वाधिक बॅटरीचा वापर करतात, त्याची लिस्ट दिसेल. तुम्ही सर्वाधिक बॅटरी वापरणाऱ्या अ‍ॅप्सला अनइंस्टॉल करू शकता. ज्यामुळे फोनची बॅटरी लाइफ वाढेल.

बॅकग्राउंड अ‍ॅप्सला त्वरित करा बंद

स्मार्टफोनची बॅटरी लवकर समाप्त होऊ नये यासाठी बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅप्सला बंद करा. ज्याप्रमाणे कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपचा वापर केल्यानंतर शट डाउन केले जाते. त्याप्रमाणे स्मार्टफोनवर देखील बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅप्सला बंद करा. अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये सुरू असल्याने फोनची बॅटरी लवकर समाप्त होते. अशाप्रकारे, तुम्ही अगदी सोप्या टिप्सच्या मदतीने फोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.

Share This News

Related Post

…अखेर ‘इतके’ पैसे मोजत एलॉन मस्क यांनी खरेदी केलं ट्विटर

Posted by - April 27, 2022 0
सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेलं ट्विटर जगभर लोकप्रिय आहे. मात्र, जगातील या सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची विक्री…

जरिया संस्थेकडून वादक अमान आणि अयान अली खान बंगेश यांच्या कार्यक्रमाचे आयोजन – दिपक भानुसे यांचे बासरीवादन

Posted by - February 15, 2023 0
‘जरिया’ या संस्थेने निधीसंकलनासाठी वादक अमान आणि अयान अली खान बंगेश यांच्या सरोद वादनाचा आणि दिपक भानुसे यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम आयोजित…

गुजरातेत भाजपच्या तिकिटावर विजयाची हॅटट्रिक साधणारी महाराष्ट्रातील खान्देशी कन्या आहे तरी कोण ?

Posted by - December 9, 2022 0
गुजरात : महाराष्ट्राच्या खान्देशातील माहेर असलेल्या एक महिला उमेदवार गुजरात विधानसभेच्या तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आणि जिंकल्यासुद्धा ! भाजपच्या या…
Aparna Nair

South Actress Death: साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

Posted by - September 1, 2023 0
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून (South Actress Death) नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साऊथ (South Actress Death) मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध…

हृदयनाथ मंगेशकरांनी मारली थाप आणि मोदींनी सोडला साप..? (संपादकीय)

Posted by - February 11, 2022 0
पहिली थाप (पं. हृदयनाथ मंगेशकर) : ‘… सागरा प्राण तळमळला’ या गाण्याला चाल लावली म्हणून आपली आकाशवाणीची नोकरी गेली दुसरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *