जाणून घ्या रेड वाईन पिण्याचे फायदे

425 0

योग्य प्रमाणात रेड वाईन प्यायल्यास आरोग्यासाठी ती फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात नेमकी काय आहेत फायदे…

1. रेड वाईनमध्ये आर्यन, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन बी 6 आणि व्हिटॅमीन सीची भरपूर प्रमाणात आढळतं. यामध्ये अनेक ॲक्टीव्ह अँटीऑक्सीडंट पण असतात. जे तुमची प्रतिकारकशक्ती वाढवतात.

2. रेड वाईनही काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते. जी चांगलं कॉलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करते. ज्यामुले तुमचं हृदय राहत निरोगी आणि वजनही संतुलित राहतं.

3. अँटीऑक्सीडंट असल्यामुळे रेड वाईन तणाव कमी करते आणि फ्री रॅडीकलपासूनही रक्षण करते. यामुळे तुमची त्वचा तुकतुकीत दिसते.

4. रेड वाईनचं सेवन हे पचनशक्तीही मजबूत करतं. मर्यादित प्रमाणात रेड वाईनचं सेवन केल्यास पोटातील बॅक्टेरिया नाश पावतात आणि पोटांचा अल्सरही कमी होतो.

5. ॲरिझोना युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनानुसार मधमाश्यांना रेड वाईनमधील रेजवेराट्रॉल नामक तत्वाचं सेवन करवण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मधमाश्यांचं आयुष्य वाढलेलं आढळलं. म्हणजे दीर्घाआयुष्यासाठीही रेड वाईन उपयुक्त आहे.

6. नुकत्याच एका शोधात आढळलं आहे की, रेड वाईनच्या सेवनाने स्मरणशक्ती बाबतच्या समस्याचंही निवारण होतं.

7. रेड वाईन ब्लड क्लॉटींग म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवरही गुणकारी आहे. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पल्मनरी एम्बोलिज्मचा धोकाही कमी होतो.

8. व्हर्जीनिया युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनानुसार, आठवड्यातून एकदा एक ग्लास रेड वाईन प्यायलास कॅन्सरचा धोकाही कमी होतो. रेड वाईन कॅन्सरच्या कोशिकांच्या वाढीची शक्यता कमी करते.

9. रेड वाईनचं सेवन हे सौंदर्यासाठीही उपयुक्त मानलं जातं. काही महिलांमध्ये वाढत्या वयासोबत त्वचेची सुंदरता कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत रेड वाईनचा वापर हा फेसपॅक म्हणून केल्यास उपयुक्त ठरतो.

10. डायबिटीस झालेल्या लोकांसाठी रेड वाईन खूपच फायदेशीर असतं. कारण यामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत होते.

11. रेड वाईनचं सेवन करणाऱ्या लोकांच्या दातातही कॅव्हिटीची समस्या आढळत नाही.

12. रेड वाईनमुळे हिरड्यांची सूजही कमी होते. दातांमधील बॅक्टेरियाही रेड वाईनमुळे नष्ट होतात आणि दात पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होतात.

13.अल्कोहॉलच्या सेवनाने गर्भधारणेच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो असं म्हणतात. पण रेड वाईन याला अपवाद आहे. रेड वाईनमुळे महिलांमध्ये गर्भधारणेची क्षमता वाढते आणि पीरियड्ससंबंधी समस्याही दूर होतात

14. जर तुम्हाला रात्री झोप लागण्याची समस्या असेल तर रेड वाईनमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. आठवड्यातून एकदा याचं सेवन केल्यास तुम्हाला चांगली झोप लागेल.

15. रेड वाईनच्या सेवनाने महिलांमध्ये सेक्स हार्मोन वाढवतात. ज्यामुळे त्यांची कामेच्छा वाढते. जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत रोमँटीक नाईट प्लॅन करत असाल तर या प्लॅनमध्ये रेड वाईनचा समावेश करायला विसरू नका.

आपण रेड वाईनच्या फायद्यांबाबत जाणून घेत असलो तरी हे विसरू नका की हा एक अल्कोहोलचाच प्रकार आहे. कोणत्याही गोष्टींचं अतिप्रमाणात सेवन केल्यास आपल्यावर चुकीचा प्रभाव पडतो. त्यामुळे याचं सेवनही मर्यादित प्रमाणात करा. तुम्ही केक किंवा चॉकलेटमध्येही रेड वाईनचा वापर करू शकता. जर तुम्हाला रेड वाईन जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी द्राक्षांचाही तुमच्या आहारात समावेश करू शकता.

Share This News

Related Post

मानसिक आरोग्य : तुमचाही स्वभाव चिडचिडा झाला आहे? हे कारण असू शकतं, वेळेत करा आत्मपरीक्षण !

Posted by - December 21, 2022 0
मानसिक आरोग्य : अनेक जणांचा स्वभाव हा चिडचिडा असतो असं आपण म्हणतो. पण ते सत्य नाही. पुष्कळ वेळा एखाद्या व्यक्तीच…
Clove

Clove : पोटाची समस्या असेल तर लवंग ठरत आहे गुणकारी

Posted by - November 3, 2023 0
लवंग (Clove) हा सर्वसाधारण मसाल्याचा पदार्थ. हा पदार्थ जवळपास सर्वच जेवणात वापरला जातो. बिर्याणी किंवा कोणताही पदार्थ बनवताना तो स्वादिष्ट…
Prashant Damle

Prashant Damle : प्रशांत दामले यांच्या मातोश्री आई विजया दामले यांचं निधन

Posted by - September 6, 2023 0
मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई विजया दामले यांचं आज (बुधवार) सकाळी 10 वाजताच्या सुमारास…

सायंकाळी 7 वाजता लग्नानंतर रणबीर-आलिया प्रसारमाध्यमांसमोर येणार

Posted by - April 14, 2022 0
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गुरुवारी संध्याकाळी 7  च्या सुमारास मीडियासमोर येणार आहेत. लग्नाची वेळ दुपारी 2 वाजताची आहे. आलिया…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *