रिकाम्या पोटी डाळिंब खाणे फायदेशीर ! जाणून घ्या कारणे

395 0

आरोग्याच्या बाबतीत आता प्रत्येकजण खूप काळजी घेताना दिसतो. आरोग्यासाठी फळे खाणे चांगले असते. असे डॉक्टर सांगतात. म्हणून बरेच लोक फळे किंवा त्याचा ज्यूस पितात. पण ज्यूस करून पिण्यापेक्षा फळे खाणे अधिक फायदेशीर असते. कारण फळांमधूनच डायट्री फायबर आणि अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. डाळींब हे अतिशय रसदार आणि गोड फळ आहे. कधीही खाल्ले तरी ते चांगलेच असते पण रिकाम्या पोटी डाळिंब खाणे अधिक फायदेशीर असते. काय आहेत ते फायदे जाणून घेऊ या..

अ‍ंटीऑक्सीडेंट

डाळिंबामध्ये पॉलिफेनोल्स नावाचं फायटोकेमिकल्स असं जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डाळिंब रोज जर रिकाम्या पोटी खाल्लं तर शरीरातील पेशांनी फ्री-रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर रोज डाळिंबाचं सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट करण्यासही मदत मिळते.

किडनी तंदुरुस्त राहते

डाळिंबातील अ‍ॅंटीऑक्सीडेंट किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तेच जर तुम्हाला किडनी निरोगी ठेवायची असेल तर डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करा. डाळिंब रिकाम्या पोटीच खाल्लं तर जास्त फायदा मिळेल.

शरीरातील सूज कमी होते

डाळिंबामुळे शरीरातील सूज कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात सूज कमी करणारे अनेक तत्व असतात. शरीरावर सूज असेल तर सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचं सेवन करा.

अनेक आजार राहतात दूर 

डाळिंबातील अ‍ॅंटीमाइक्रोबियल गुण याला एक प्रभावी अ‍ॅंटीबायोटिक बनवतात. ज्यामुळे संक्रमण आणि नुकसानकारक बॅक्टेरियासोबत लढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला हेल्दी रहायचं असेल डाळिंबाचं सेवन नियमितपणे करा.

Share This News

Related Post

parag-karandikar

Parag Karandikar : कौतुकास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती

Posted by - July 7, 2023 0
पुणे : ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर (Parag Karandikar) यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.…
Manoj Jarange

Manoj Jarange : गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा; कसा आहे जरांगे पाटलांचा संघर्षमय प्रवास?

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच तापलेला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)…
Gautami Patil

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Posted by - January 9, 2024 0
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलला (Gautami Patil) जवळजवळ सगळेच ओळखतात. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात गौतमी पोहोचलेली आहे. खेड्यापाड्यात…

अकोला जिल्हा न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा

Posted by - April 19, 2022 0
अकोला जिल्हा न्यायालयात बुक बाइंडर पदाची भरती केली जाणार आहे. या पदासाठी दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.…

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू

Posted by - April 9, 2022 0
  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज दुपारी झालेल्या कारचा भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारनं उभ्या ट्रकला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *