पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

87 0

पुणे- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात ६००० रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील १ कोटी ९ लाख ४६ हजार लाभार्थ्यांना एकूण १८ हजार १५१ कोटी ७० लाख रुपये लाभ अदा करण्यात आलेला आहे.

लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर

https://pmkisan.gov.in/

या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यापूर्वी ई-केवायसी ३१ मे २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम १५ रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात येईल.

राज्यात २६ मे २०२२ अखेर एकुण ५२ लाख ८२ हजार लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्रच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या ३१ जुलै २०२२ च्या मुदतीपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन उपआयुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख, पी.एम.किसान विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

पीएमआरडीए विकास आराखड्यावर सोमवारपासून सुनावणी

Posted by - March 11, 2022 0
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने प्रारूप विकास आराखड्यावर आलेल्या हरकती, सूचनांवर सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या सोमवार…
Megha Dhade

‘बिग बॉस मराठी फेम’ मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; ‘या’ राजकीय पक्षात केला प्रवेश

Posted by - June 15, 2023 0
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) ही आपल्या बोल्ड लुक आणि बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. तिने आजवर अनेक…

जिओची भन्नाट ऑफर ! वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज आणि दररोज ३ जीबी डेटा आणि Disney+Hotstar फ्री

Posted by - May 27, 2022 0
नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठ्या असलेल्या जिओ टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीने दररोज ३ जीबी…
Seema Haider

Seema Haider : सीमा हैदर ‘त्या’ शेजारणीवर दाखल करणार मानहानीचा खटला

Posted by - August 15, 2023 0
पाकिस्तानी महिला सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची ‘लव्ह स्टोरी’ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा…
Mumbai News

Mumbai News : मोठी कारवाई ! मुंबईतून कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त, 2 जणांना अटक

Posted by - December 10, 2023 0
मुंबई : मुंबईमधून (Mumbai News) एक मोठी बातमी समोर आली आहे. हशिश ऑईल या अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी 2…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *