पुनश्च हरिओम..! आजपासून राज्यात दहावीची ऑफलाइन परीक्षा सुरू

174 0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहेकोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीच्या ऑफलाईन परीक्षेला आज सुरवात झाली असून शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातंय.

16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटं तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.आज पहिला पेपर हा प्रथम भाषेचा आहे.

परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीनं मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेष महिला भरारी पथक आणि काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे.

नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिराने परीक्षांचा आयोजन करण्यात आलं आहे. शाळा स्तरावर परीक्षा केंद्र उपकेंद्र देण्यात आली आहेत. 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून दिली आहे. तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा देण्यात आली आहे.

दहावी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक

15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
19 मार्च : इंग्रजी
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च : गणित भाग – 1
26 मार्च : गणित भाग 2
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2

Share This News

Related Post

Mantralaya

Suicide Attempt : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - August 4, 2023 0
मुंबई : मुंबईतील मंत्रालय परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोर एका व्यक्तीने…
Supriya-Sule-Ajit-Pawar-Maharastra

“अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन,” सुप्रिया सुळेंचा केसरकरांना टोमणा

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना शिवसेनेचे नेते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak…

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 6 महिने पुढे

Posted by - March 7, 2022 0
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान…

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या प्रकरणावर कंगना रणौतचे स्पष्ट मत; वाचा…

Posted by - June 8, 2022 0
पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेत्या नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं होतं. अशा वक्तव्यामुळे चर्चेत आल्यानंतर…
Thane

ब्रीजवरून पडलेली सळई गाडीच्या छतातून आरपार; थोडक्यात बचावला ड्रायव्हर (Video)

Posted by - June 5, 2023 0
ठाणे : सध्या मेट्रोची अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अशा अनेक संकटांचा सामना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *