पुण्यातील पाणीप्रश्नी गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

116 0

पुणे- पुणे शहरातील पाणीप्रश्नावर खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर अंकुश काकडे, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, शशिकांत जगताप, आसिफ शेख, गणेश नलावडे, सचिन शेलार, वनीता जगताप, नीता गलांडे, युसुफ शेख, संजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी खासदार बापट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “अहो बापट, काय हे नाटक? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट” “गिरीश बापट जवाब दो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ” “पुणे शहरात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षात शहरातील पाणीपुरवठ्याचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येणे, दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद असणे,पाणी न येणे असे प्रकार वारंवार घडत असून हे महापालिकेतील गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपचे अपयश आहे. पुणेकरांच्या या मनस्तापाला केवळ भाजप जबाबदार आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी 24×7 पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगत भाजप सत्तेत आली. आज प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की २४ तास तर सोडा हक्काचे १ तास सुध्दा पाणी मिळत नाही”

Share This News

Related Post

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : मोदींच्या काळात 17 लाख हिंदू कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं; आंबेडकरांचा आरोप

Posted by - May 2, 2024 0
सोलापूर : मोदींच्या काळात तब्बल 17 लाख हिंदू कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत. त्यांच्याकडे केलेल्या…
Rape

पुण्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Posted by - May 20, 2023 0
पुणे : बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणार्‍या महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचे (Maharashtra…

पुणे जिल्ह्याचा वार्षिक पत आराखडा जाहीर, गेल्यावर्षापेक्षा २६ टक्क्यांनी वाढ

Posted by - March 28, 2023 0
पुणे: पुणे जिल्ह्याचा सन २०२३-२४ साठी १ लाख ४७ हजार ८०० कोटी रुपयांचा वार्षिक पत पुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला…
Nawab Malik

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का ! हायकोर्टानं जामीन फेटाळला

Posted by - July 13, 2023 0
मुंबई : आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा धक्का…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *