यूजीसीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, हा आहे अखेरचा दिवस !

180 0

नवी दिल्ली- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नेट डिसेंबर 2021 आणि नेट जून 2022 सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलली आहे. आता विद्यार्थ्यांना 30 मे पर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत.

यापूर्वी अर्ज करायची शेवटची तारीख 20 मे 2022 होती.त्याचप्रमाणे NTA कडून उमेदवारांसाठी करेक्शन विंडो सुरु करण्यात आलीये. या विंडोवर जाऊन उमेदवार आपल्या फॉर्म भरताना झालेल्या चुका सुधारू शकतो. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी. अर्जदार यूजीसी नेट अर्ज (UGC NET 2022 Applicaion ) ऑनलाइन पद्धतीनेच जमा करू शकतात. यूजीसी नेट परीक्षा 82 विषयांमध्ये संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांनी व्यवस्थित आणि वेळेत अर्ज जमा केलेला आहे त्या अर्जदारांना युजीसी नेट प्रवेश पत्र 2022 मिळेल.

निर्धारित वेळेनंतर एनटीए फॉर्ममध्ये बदल करण्याची कोणतीही संधी देणार नसल्याने उमेदवारांनी वेळेत अर्जात बदल करण्याची विनंती केली आहे. यूजीसी नेट डिसेंबर 2021 आणि नेट जून 2022 परीक्षा एनटीएच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. मात्र, परीक्षा केंद्रांची माहिती एनटीएकडून नंतर जाहीर केली जाणार आहे.

UGC NET 2022 साठी असा अर्ज करा-

एनटीए यूजीसी नेट ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
होम पेजवर खाली यूजीसी नेट डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी या लिंकवर क्लिक करा.
यूजीसी नेट रजिस्ट्रेशन 2022 पूर्ण करण्यासाठी तपशील भरा आणि पासवर्ड तयार करा.
यूजीसी नेट 2022 अर्ज क्रमांक उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे.
आपल्या यूजीसी नेट 2022 अप्लिकेशन नंबर आणि पासवर्डवर लॉग इन करा आणि दिलेला कोड सबमिट करा.
युजीसी नेट अर्ज 2022 भरा.
आता स्कॅन केलेला फोटो आणि सही अपलोड करा.
यूजीसी नेट 2022 नोंदणी शुल्क भरा.
यूजीसी नेट ऑनलाइन फॉर्म 2022 सबमिट करण्याआधी पडताळून पहा, सबमिट करा.
फॉर्मची प्रिंट आऊट काढा आणि जवळ ठेवा.
अर्ज शुल्क

यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या General कॅटेगरीतील उमेदवारासाठी 1100 रुपये, EWS/OBC-NCL ५५० आणि SC/ST/ PWD / Transgender साठी 275 शुल्क आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे. अर्ज दुरुस्त करण्यासाठीची विंडो 21 मे ते 23 मे या कालावधीत खुली राहणार आहे. जूनमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted by - May 26, 2022 0
पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक…

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणते, ” माझ्या नृत्यात कुठेही अश्लीलता नाही, आधी जे झालं…!”

Posted by - December 28, 2022 0
पुणे : गौतमी पाटील हे नाव आज महाराष्ट्रासाठी फारसं नवीन राहिलेलं नाही. महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य करण्यासाठी गौतमी पाटील…
Basavaraj Bommai

भाजपच्या महत्वाच्या बैठकीमध्ये अचानक झाली ‘त्याची’ एन्ट्री; आणि मग….. (Video)

Posted by - May 13, 2023 0
बंगळुरू : कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान पार पडले होते. यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सध्या कर्नाटकच्या…
Welcome 3

Welcome 3 : संपूर्ण बॉलिवूड एकाच ठिकाणी ! ‘वेलकम 3’ चा टीझर रिलीज

Posted by - September 9, 2023 0
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिल आहे. वाढदिवसानिमित्त…

अभिनेता गौरव मोरेनं घेतला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक; समोर आलं हे मोठं कारण

Posted by - May 28, 2023 0
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *