थेरगाव कब्रस्तानच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांचे तिरडी आंदोलन

504 0

पिंपरी- २१ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव,काळेवाडी ,वाकड परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी आज तिरडी आंदोलन केले. पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले होते.

थेरगाव,काळेवाडी ,वाकड परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कब्रस्तान संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पिंपरी चिचंवड महानगरपालकीचे आयुक्त राजेश पाटील यांना कब्रस्तान संघर्ष समिती कडून कब्रस्तानच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. काळेवाडी,थेरगाव ,वाकड परिसरात मुस्लिम कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दफन करण्यासाठी जागाच नसल्याने मुस्लिम बांधवांच्या मानवी अधिकाराचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात येत होती.

वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनची उदासीनता दिसत असल्याने आज मुस्लिम बांधवांच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात
हाजी गुलजार ,मौलाना अलीम अन्सारी, कारि इकबाल, मौलाना इस्लामुद्दीन उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, इंटकचे कैलास कदम, सतीश काळे, धनाजी येळकर, धम्मराज साळवे यांनी कब्रस्तानच्या मागणीसाठी आम्ही समिती सोबत असून त्यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

यावेळी बोलताना समनव्यक सिद्दीकभाई शेख म्हणाले, ” २१ वर्षांपासून प्रलंबित कब्रस्तानचा विषय तात्काळ मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन पालिकेकडून मिळालेले आहे. कब्रस्तानचा विषय आश्वासन दिल्याप्रमाणे जलदगतीने न सुटल्यास पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उगारले जाईल”

सदर आंदोलनाची दाखल घेऊन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कब्रस्तान संघर्ष समितीची बैठक घेऊन मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानचा प्रश्न सोडवण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे सांगितले. पिंपरी चिचंवड महानगरपालिकेकडून सदरचे पत्र कब्रस्तान संघर्ष समितीचे समनव्यक सिद्दीकभाई शेख यांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Share This News

Related Post

Pune News

Chhagan Bhujbal : ‘वेळीच थांबा, नाहीतर… स्वराज्य संघटनेचा पोलिसांसमोरच भुजबळांना इशारा

Posted by - November 27, 2023 0
पुणे : सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद पेटताना दिसत आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून…

पुणे जिल्हा परिषदेवर 21 मार्च पासून प्रशासक येण्याची शक्यता ?

Posted by - March 11, 2022 0
जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल येत्या २१ मार्च रोजी संपत आहे. अद्याप गट आणि गणांची प्रारूप रचना अंतिम…
aadipurush

प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार‘आदिपुरुष’चा ट्रेलर

Posted by - May 6, 2023 0
पुणे : रामायणावर आधारित असलेला प्रभास आणि क्रीती सेनॉन स्टारर चित्रपट ‘आदिपुरुष’ची सिने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा होत आहे. हा चित्रपट…

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना ‘हे’ महत्वाचे आदेश

Posted by - December 13, 2022 0
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. या प्रकरणानंतर…
Madandas Devi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

Posted by - July 25, 2023 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *