खासगी बसमधून प्रवास करताना माय लेकराचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू

608 0

इंदूर- खासगी बसमध्ये माय -लेकराचा संशयास्पद परिस्थितीत गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्याहून उज्जैनला जाणाऱ्या बसमध्ये घडली आहे.

दीपिका संदीप पटेल ( 38 वर्षे ) आणि आदित्यराज ( 11 वर्षे ) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माय लेकरांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, दीपिका पटेल या आपला मुलगा आदित्यराज आणि आई पुष्पा यांच्यासोबत अशोक ट्रॅव्हल्सच्या एसी बसने ( MP07 – P – 5097) पुण्याहून उज्जेनला निघाल्या होत्या. दोघांनीही बसमध्ये गुदमरायला होत असल्याची तक्रार केली मात्र, गॅसचा वास येत असल्याचे सांगून कंडक्टरने लक्ष दिले नाही. मात्र इंदूरला पोहोचेपर्यंत दीपिका आणि तिचा मुलगा आदित्य यांची प्रकृती ढासळू लागली.

त्यांची तब्येत बिघडल्यावर कंडक्टरने दोघांनाही इंदूरच्या मध्यभागी खाली सोडले आणि ऑटोमधून होस्पिटलमध्ये पाठवले. त्याठिकाणी दोघांचा मृत्यू झाला.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. बसमध्ये लावलेल्या अग्निशामक यंत्रातून गॅस गळती झाल्याने ही घटना घडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

ट्रॅव्हल्स संचालक राजेश शर्मा यांनी सांगितले की , महिलेने तब्येत बिघडल्याची तक्रार केली होती . बसमध्ये इतर 30 प्रवासीही प्रवास करत होते . यापैकी कोणाचीही प्रकृती बिघडलेली नाही . महिलेनंतर तिच्या मुलालाही उलट्या आणि जुलाब होऊ लागले . दोघांनाही वाहनात उलट्या झाल्या , त्यामुळे त्यांना केबिनमध्ये हलवण्यात आले . वाटेत एका ठिकाणी गाडीही थांबली . इंदूरला येईपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच बिघडली .

Share This News

Related Post

रक्तातील साखरेची पातळी लवकर कमी करण्यासाठी तुतीची पाने खाणे खूप फायदेशीर

Posted by - April 12, 2022 0
आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक तिसर्‍या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होतो. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे ही समस्या लोकांमध्ये दिसून येत असल्याचे…

हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - April 1, 2022 0
पिंपरी- बेंगलोर येथे कर्नाटक जिमनॅस्टिक संघटने तर्फे १६ वी राष्ट्रीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या…
DRDO

Pradeep Kurulkar News Update: डॉ. प्रदीप कुरुलकरांनी मोबाइलमधील डेटा केला होता डिलीट, तपासात धक्कादायक माहिती समोर

Posted by - August 3, 2023 0
पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओचे (DRDO) पुण्याचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar…
Sana Khan

Sana Khan News : तो मृतदेह सना खानचा नाही; DNA रिपोर्ट समोर आल्याने उडाली खळबळ

Posted by - September 9, 2023 0
नागपूर : नागपुरातील भाजपच्या नेत्या सना खान (Sana Khan Murder) यांच्या हत्याप्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपुरातील सना…
Pune News

Pune News : चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’ला ‘शालिमार’चा थाट

Posted by - April 4, 2024 0
पुणे : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिना (Pune News) सध्या सुरू असून, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय खवय्ये आतुरतेने या महिन्याची वाट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *