अनेक मुली आज ही शाळेपासून वंचित

591 0

सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला. परंतु आजही अनेक मुली शाळेपासून वंचित राहत असून विविध कारणांमुळे त्यांना आपले शिक्षण सोडावे लागत असल्याचे चित्र विविध सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.

राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थिनींना आजही मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने 2020 मध्ये दहावी बारावी पास झालेल्या मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी जवळपास 11 हजार 121 मुलींचे सर्वेक्षण केले. यामध्ये जवळपास 51 टक्के मुलींनी शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सक्षम नसल्याचे स्पष्ट केले.तरी यंदा देखील जिल्ह्यातील शाळाबाह्य किशोरी मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये 36 मुलींची शाळा सोडल्याची माहिती समोर आली.

राज्य सरकार मुलींसाठी विविध योजना, शिष्यवृत्ती प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवत असते. परंतु मुलींना जास्त शिक्षण देण्याची मानसिकता नसणे आणि कमी वयात मुलींची लग्न करणे या दोन प्रमुख कारणांमुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले

Share This News

Related Post

गृहिणींसाठी आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात प्रती लीटर 20 रुपयांची कपात

Posted by - June 17, 2022 0
नवी दिल्ली- वाढत्या महागाईच्या दरात सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत कपात झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्यात…

मुख्यमंत्री कुणाचा? गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे आज निकाल

Posted by - December 8, 2022 0
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभांचे निकाल आज स्पष्ट होणार असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष…

अमिताभ-रश्मिकाच्या ‘गुडबाय’ चित्रपटाचा फर्स्ट लूक ; चाहत्यांमध्ये उत्सुकता

Posted by - September 3, 2022 0
मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये बॉयकॉटचे वादळ सुरू आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते आणि कलाकारांमध्ये देखील धाकधूक सुरूच आहे. मोठे चित्रपट वाईट…
Sunil Tatkare

Sunil Tatkare : 2019 सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असतं; सुनील तटकरेंचं मोठं विधान

Posted by - November 30, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले. यानंतर दोन्ही गटांकडून…

पुण्याची प्रभाग रचना पुन्हा नव्यानं! तीन की चार सदस्यीय असेल प्रभाग रचना याबाबत मात्र संभ्रम !

Posted by - November 23, 2022 0
महाराष्ट्र : पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महापालिका निवडणुकांसाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्यानं करण्याचे आदेश राज्य सरकारने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *