Smartphone

तुमचा मोबाइल हँग होतोय?… काय आहेत कारणं?

173 0

मुंबई : मोबाईल (Mobile) हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल सगळेजण अपडेट झाले आहेत. ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत, पेमेंटपासून ते शॉपिंगपर्यंत सर्व काही स्मार्टफोनच्या माध्यमातून केले जाते. स्मार्टफोन हा एक प्रकारची गरज बनला आहे. त्यामुळे काहीजण फोनला फिजिकल डॅमेज होऊ नये म्हणून त्याला बॅक कव्हर लावत असतात.

आपला स्मार्टफोन उठावदार आणि आकर्षक दिसावा ही प्रत्येकाची इच्छा असते. हल्ली सगळ्यांकडेच महागडे मोबाईल असतात, त्यामुळे मोबाईल अनेक दिवस चांगला राहावा यासाठी लोक त्यावर कव्हर देखील वापरतात. मात्र या कव्हरमुळे तुमचे नुकसान होण्याचेही शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया कव्हर वापरल्याने मोबाईलचे नेमके काय नुकसान होते.

1) फोन वारंवार गरम झाल्याने तो हँग (Mobile Hang) होऊ लागतो. अचानक बंद होणं, स्क्रीन रिस्पॉन्स न करणं, फोन रिसिव्ह न करता येणं, यासारख्या अडचणी फोन हँग होण्यास सुरुवात झाली की जाणवू लागतात.
2) कव्हरमुळे (Mobile Cover) फोनमधील हीट बाहेर पडू शकत नाही आणि तो तापतो. त्यामुळे त्याच्या बॅठरीवरही (Battery) परिणाम होतो.
3) युजर्स मोबाईल कव्हर कधीच काढून स्वच्छ करत नाही. वर्षानुवर्षे मोबाईल कव्हरच्या वापरामुळे पॅनलवर धूळ साचते, त्यामुळे फोनची बॉडी खराब होऊ शकते.

Share This News

Related Post

Hemangi Kavi

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Posted by - March 8, 2024 0
मुंबई : न्याय्य हक्क, समान अधिकारासाठी महिला चळवळींनी केलेल्या संघर्षाची आठवण म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त…

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, सहा महिलांची सुटका

Posted by - April 13, 2022 0
पुणे – मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ‘ओरा स्पा’ सेंटरवर पोलिसांच्या सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत स्पा…
Filmfare Awards 2024

Filmfare Awards 2024 : ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट

Posted by - January 28, 2024 0
चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘फिल्मफेअर.’ गुजरातमधील गांधी नगर येथे फिल्मफेअर पुरस्कार 2024 (Filmfare Awards 2024) चे आयोजन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *