युएसबी टाईप – सी पोर्टसह नवीन iPhone; लवकच बाजारात येऊ शकतो

236 0

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि बाजारपेठेतील मागणीनंतर आता अॅपल आपला आयफोन यूएसबी टाइप-सी पोर्टसह लॉन्च करणार असल्याचे वृत्त आहे. नवीन आयफोनमध्ये यूएसबी टाइप-सी मिळेल, जो 2023 मध्ये लॉन्च होईल अशी माहिती अनेक रिपोर्ट्स मधून आली असल्याचे सांगितले जात आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की Apple यूएसबी टाइप-सी पोर्टसह नवीन आयफोनची चाचणी करत आहे. या वर्षी लॉन्च होणाऱ्या आयफोनमध्ये लाइटनिंग पोर्ट उपलब्ध असेल. परंतु त्यानंतर, आयफोन 15 टाइप-सी पोर्टसह ऑफर केला जाईल. परंतू Apple ने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही.

सध्या, iPad Pro, iPad Air आणि iPad Mini USB Type-C पोर्टसह उपलब्ध आहेत. युरोपियन युनियन अनेक दिवसांपासून युनिव्हर्सल चार्जरची मागणी करत आहे. सर्व गॅजेट्स चार्ज करण्यासाठी एकाच प्रकारचे चार्जर वापरावे, असे युरोपियन युनियनचे म्हणणे आहे. हा आयफोन लॉन्च झाल्यास युजर्सना सोपे होणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातही घट होणार आहे.

Apple सध्या iPhone 14 सीरिजवर काम करत आहे. या सीरीज अंतर्गत, iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

Share This News

Related Post

दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूयात ‘नारळाचा चव आणि खव्यापासून सुरेख करंज्यांची रेसिपी

Posted by - October 13, 2022 0
दिवाळी फराळाला सुरुवात केलीत का? अनेक गृहिणींनी सामानाची जमवाजमा करायला सुरुवात नक्कीच केली असणार आहे. चला तर मग आज पाहूयात…

जागतिक सर्पदिन विशेष : सर्पदंश – काळजी आणि उपचार

Posted by - July 16, 2022 0
जागतिक सर्पदिन विशेष : सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्याची…

उद्धव ठाकरेंवर टीका ते शिवसेनेत प्रवेश; कोण आहेत सुषमा अंधारे?

Posted by - July 29, 2022 0
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी विधान…

गुगलची नवीन घोषणा तुमच्यासाठी महत्वाची आहे, जाणून घ्या

Posted by - May 2, 2022 0
नवी दिल्ली,- गुगलने नवी मोठी घोषणा केली आहे. गुगल सर्चमधून फोन नंबर, ईमेल, अॅड्रेस हटवण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकांच्या संवेदनशील…
Dagdusheth Ganapati

Dagdusheth Ganapati : ‘दगडूशेठ’ च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचे उद्घाटन मंगळवारी पार पडणार

Posted by - September 16, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdusheth Ganapati) , सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *