Upgrade Your Fashion Style : या थंडीमध्ये तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत हे कपडे आणि ॲक्सेसरीज !

272 0

फॅशन म्हणजे नक्की काय ? असा प्रश्न आजपर्यंत तुम्ही खरंतर स्वतःला विचारला असणार आहे. बऱ्याच वेळा काही जणांचा फॅशन सेन्स खूप छान असतो. मग त्यांचे कपडे पाहून तुम्हालाही मनामध्ये वाटत असेल की, आपणही काहीतरी स्टायलिश ट्राय करावं… पण नेमकी गल्लत इथेच होते की, फॅशन म्हणजे नक्की काय हेच तुम्हाला माहिती नसतं. तर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. फॅशन म्हणजे आहे कम्फर्ट… तुम्हाला काय शोभून दिसतय आणि त्यात तुम्ही किती कम्फर्टेबल आहात हे महत्त्वाचं ! तेव्हाच कुठे तुम्हाला ते कपडे कॅरी करता येतील. चला तर मग आज आपण पाहूयात की या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आणि छान दिसणारे असे कपडे आणि ॲक्सेसरीज मार्केटमध्ये सध्या कोणत्या ट्रेंडिंग आहेत.

स्कार्फ, जॅकेट्स आणि काऊबॉय शूज हे खरंतर आत्ताच्या फॅशन स्टेटमेंट मध्ये येत नाहीत. पण त्याला तुम्ही स्टाईल कसं करता आहात हे खूप महत्त्वाचं आहे. या काही फोटोज वरून तुम्हाला याचा अंदाज येऊ शकतो की, इतक्या सिम्पल पद्धतीने तुम्ही तुमचा लुक किती उठावदार करू शकता. तर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले तुमच्या वॊर्डरॉबमध्ये प्लेन आणि काही ठराविक स्कार्फ नक्की जमा करा. जसे की ब्लॅक, व्हाईट आणि ब्राऊन…! स्कार्फ घेताना शक्यतो शिमरी घेऊ नका आणि अशा पद्धतीने तुम्ही तो स्टाईल करू शकता. आहे की नाही हा स्टायलिश लुक…!

दुसरं म्हणजे तुमच्या वॊर्डरॉबमध्ये असे काही जॅकेट्स जमा करा कि जे थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला उब तर देतीलच, पण ते तितकेच फंकी सुद्धा दिसतील. जसे की हे जॅकेट…

या जॅकेटमध्ये फार कलर नाहीयेत किंवा खूप डिझाईन देखील नाहीये. प्लेन आणि पेल कलर्स वापरले गेले आहेत. तुम्हाला जर जास्त गडद रंगाचे आणि डिझाईनचे जॅकेट्स आवडत असतील तर तुम्ही प्लेन टी-शर्ट देखील आतून घालू शकता.

जीन्स हा कोणत्याही ऋतूमध्ये सूट करणारा आऊटफिट आहे. पण विशेष करून थंडीच्या दिवसातच प्रेफर केला तर बरा. कारण उन्हाळ्यामध्ये खूप टाईट घालणं काही जणांना आवडत नाही. पावसाळ्यात देखील अनेकींना ते कम्फर्टेबल वाटत नाही. तर मग तुम्ही ब्लू शेडवर असे काही फंकी टॉप्स ट्राय करू शकता. तुम्ही ब्लू जीन्स वर डार्क आणि लाईट कलर देखील सहज घालू शकता ते सूट करतात.

तर मग या मधला तुम्हाला कोणता लूक जास्त आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुणे शहरात तब्बल ‘एवढ्या’ गणपतींचे झाले विसर्जन

Posted by - September 29, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या…

मुलं चिडचिड होत आहेत… मोबाईल हातातून सुटत नाही ? या समस्या तुम्हाला जाणवत असतील, तर हि माहिती अवश्य वाचा…

Posted by - July 28, 2022 0
आजकालच्या पालकांना मुलांचा चिडचिडेपणा, अभ्यास न करणे, मोबाईल-लॅपटॉप घेऊन बसणे, मैदानी खेळ खेळण्यास नकार देणे आणि जंक फूड खाणे अशा…

पंढरपुरातील शासकीय महापूजेचा काय आहे इतिहास ?

Posted by - July 10, 2022 0
महाराष्ट्रात वारीची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी मैलोनमैल प्रवास करत वारीत सहभागी होतात आणि…

जिओ ट्रू 5G पॉवर्ड वाय-फाय लाँच; आकाश अंबानी यांच्याकडून नाथद्वारामध्ये शुभारंभ

Posted by - October 22, 2022 0
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (जिओ) ने आज जिओ ट्रू 5जी नेटवर्कवर चालणाऱ्या वाय-फाय सेवा सुरू केल्या आहेत. ही सेवा शैक्षणिक…

व्हॉट्सॲपने लॉन्च केलं नवीन फीचर ; वाचा काय आहे नवीन फीचर

Posted by - March 19, 2022 0
अलीकडच्या काळात व्हॉट्सॲपने अनेक फीचर्स लॉन्च केले आहेत. आता या ॲपने पुढचे पाऊल टाकत एक नवे फिचर युजर्ससाठी आणले आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *