Propose Day 2024

Propose Day 2024 : प्रेम व्यक्त करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; नातं अधिक घट्ट होण्यास होईल मदत

3839 0

व्हॅलेंटाईन आठवडा हा जगभरात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या आठवड्यात अनेकजण आपल्या प्रिय व्यक्तीला मनातील भावना (Propose Day 2024) व्यक्त करत असतात. अनेकदा लोक आपल्या भावना किंवा प्रेम व्यक्त करु शकत नाहीत त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय खास असतो.रोझ डे हा व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस आहे. तुमच्या क्रशसमोर भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे गुलाब दिले जातात. प्रपोज डे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी, मनात सगळी हिम्मत एकवटून भावना व्यक्त केली जाते. या भावना व्यक्त करताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाच्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया….

1) प्रेम व्यक्त करताना तुम्ही आधी तुमच्या कुटुंबाचा सर्वात अगोदर विचार करा. कारण प्रेम ही भावना माणसं जोडते तोडत नाही.

2) जर तुम्ही एखाद्या मुलीवर तुमचे प्रेम व्यक्त करणार असाल तर लक्षात ठेवा की, ती कितीही आधुनिक असली तरीही ती मनाने भारतीय आहे. प्रेम व्यक्त करण्यात घाई करू नका. सर्वात अगोदर तिचे मन समजून घ्या, मग प्रपोज करा.

3) जेव्हा तुम्हाला तुमच्या ड्रीम गर्लच्या आवडीनिवडी आणि नापसंती माहित असतील तेव्हा प्रेम अधिकप्रकारे चांगले व्यक्त करता येईल.

4) तुमचं प्रेम कोणावर व्यक्त करण्याआधी हे जाणून घ्या की तो किंवा ती दुस-या कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये आहे की नाही किंवा तुम्हाला आवडणारी व्यक्ती इतर कोणाला आवडत नाही ना?

5) प्रेम फक्त शब्दात व्यक्त करता येत नाही. तुमचं त्यांच्यावर अतोनात प्रेम आहे, हे तुमच्या वागण्या-बोलण्यातूनही समजावून सांगा. जर तिला तुमच्या वागण्यातून कळले की तुम्ही तिच्यावर प्रेम करता, तर तुम्ही प्रपोज केल्यावर ती लगेच हो म्हणू शकते.

6) तुम्हाला आवडणारी आणि प्रपोज करणार असलेल्या व्यक्तीला असे वाटू द्या की तुम्हाला त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यात रस आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या कुटुंबाबद्दल देखील सांगू शकता जेणेकरून तुम्ही त्याच्याबद्दल गंभीर आहात हे त्याला समजेल.

7) तुमच्या जोडीदाराला वाटू द्या की तो इतरांपेक्षा वेगळा आहे आणि तो तुमच्यासाठी इतका खास का आहे. तुमच्या प्रेयसीच्या मित्रांशी मैत्री वाढवा आणि तुमच्या जोडीदाराबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

8) जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रेयसीला तुमच्या मनातील भावना व्यक्त करत नाही तोपर्यंत तुमच्या भावना सार्वजनिक करू नका. तुम्ही तुमच्या प्रेयसीला प्रपोज करणार असाल तर तिसऱ्या व्यक्तीला मध्ये घेऊ नका. यामुळे तुमच्या जोडीदारासमोर तुमची इमेज खराब होऊ शकते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar NCP : नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार; शरद पवार गटाला मिळाले नवे नाव

Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितने केले सूचक ट्विट

Dhangar Society : पुणे धनगर समाजाकडून ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन

EVM : ईव्हीएम मशीन चोरीला; पुण्यात ‘या’ ठिकाणी गुन्हा दाखल

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Related Post

उद्धव ठाकरेंवर टीका ते शिवसेनेत प्रवेश; कोण आहेत सुषमा अंधारे?

Posted by - July 29, 2022 0
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी विधान…

ढाल तलवार, रेल्वे इंजिन ते धनुष्यबाण; कसा आहे शिवसेनेच्या निवडणुक चिन्हाचा इतिहास

Posted by - October 9, 2022 0
मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज…

जिओकडून “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर

Posted by - March 28, 2022 0
एका रिचार्जवर पूर्ण महिन्याची वैधता “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर करणारी जिओ पहिली टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ठरली आहे. या योजनेमध्ये…

सावधान ! मोबाइलमधील हे 7 धोकादायक Apps तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक app असतात. वेगवेगळ्या कामासाठी असलेले हे app तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतात. पण तुम्हाला माहित आहे का,…

#CREDIT CARD : क्रेडिट कार्डवर चारचाकी खरेदी करताय ? थांबा ही माहिती वाचा

Posted by - March 21, 2023 0
अर्थकारण : क्रेडिट कार्डमुळे खिशात पैसा बाळगण्याची गरज राहिलेली नाही. काहींची मर्यांदा लाखांच्या घरात असल्याने बरीच मंडळी क्रडिट कार्डवरून व्यवहार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *