Love Vs Attraction

तुम्ही करताय ते ‘प्रेम’ आणि की ‘शारीरिक आकर्षण’?

423 0

प्रेमात पडायला कोणाला (Love Vs Attraction) आवडत नाही. प्रेमात पडलं की व्यक्ती आजूबाजूच्या गोष्टी विसरतो असं म्हणतात… मुळात एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम (Love Vs Attraction) करते, आपली काळजी घेते ही भावनाच संबंधित व्यक्तीसाठी महत्त्वाची असते. कदाचित तुम्हीही प्रेमात असाल, किंवा यापूर्वी कधीतरी तुम्हीही प्रेम केलं असेल…मात्र हे प्रेम आहे की एखाद्या व्यक्तीपोटी असलेलं आकर्षण ? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. तुम्ही प्रेमात पडला आहात की तुम्हाला आकर्षण आहे. यामध्ये नेमका काय फरक आहे ते आपण जाणून घेणार आहे.

प्रेमाचे 3 पैलू असतात
“रोमँटिक प्रेमाचे 3 पैलू असतात. यामध्ये लैंगिक संबंधांची इच्छा हा प्रथम पैलू असतो. मात्र प्रत्येकवेळी असंच असेल असं नाही. काही लोकांमध्ये फिजीकल रिलेशनची इच्छा नसते. पण, लैंगिक संबंधांची इच्छा ही एस्ट्रोजेन आणि टेस्टास्टरोन सारख्या हार्मोनवर अवलंबून असते.” एस्ट्रोजेन आणि टेस्टास्टरोन हे हार्मोन तुमच्या लैंगिक क्षमतेवर तसंच आणि इच्छेवर परिणाम करतात. या पूर्णपणे शारीरिक गरजा असतात. अशावेळी व्यक्तीला फिजीकल रिलेशन ठेवण्याची इच्छा होते. एखाद्या व्यक्तीत हे हार्मोन त्यांच्या पालकांकडून डीएनएतून येऊ शकतात.

रोमँटिक प्रेमाचा दुसरा पैलू असतो तो म्हणजे आकर्षण. हे न्यूरोट्रांसमीटरपासून प्रभावित होत असून याला डोपामाईन असंही म्हटलं जातं. हे आपल्या मेंदूत निर्माण होणारं जैविक रसायन आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला लाभ मिळवण्यासाठी प्रोत्साहित करत असतं. मात्र डोपामाईन व्यक्तीला वारंवार एकच काम करण्यासाठी प्रवृत्त करतं.

प्रेमाचा तिसरा पैलू असतो तो म्हणजे जवळीकता आणि मैत्री. जर तुम्हाला तुमचं नातं दीर्घकाळ टिकावं असं वाटतं, तर त्यासाठी नात्यामध्ये मैत्री, एकमेकांचा सहवास आणि जवळीकता या गोष्टी असणं आवश्यक आहे. जर तुमच्या नात्यामध्ये असं असेल त्यावेळी ऑक्सिटोसिन आणि वेसोप्रेसिन हे हार्मोन्स स्रवले जातात.

आकर्षण म्हणजे नेमकं काय?
आकर्षणामध्ये 2 इतर हार्मोन देखील काम करतात. ऑक्सिटोसिन आणि वेसोप्रेसिन असं या हार्मोन्सचं नाव आहे. ऑक्सिटोसिन आपल्याला एखाद्या व्यक्तीला मीठी मारण्यासाठी प्रवृत्त करतं. हे हार्मोन सेक्सदरम्यान निर्माण होतं. या हार्मोनतं काम शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करणं असतं. वेसोप्रेसिन हे हार्मोन मात्र सेक्स केल्यानंतर निर्माण होतो. हे हार्मोन तुम्हा समाधानाची भावना निर्माण करण्यास मदत करतो. फिजीकल रिलेशनची इच्छा असलेल्या लोकांना हे हार्मोन शिकार बनवू शकतं. हे लोकांच्या मेंदूतील त्या भागावर अधिक प्रभाव टाकतो, जे भाग सेक्सला लाभाची गोष्ट समजून सेक्स करण्यास प्रवृत्त करतो. मात्र या हार्मोनचा अजून एक परिणाम दिसून येतो, तो म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत असता, त्याच्यासोबत राहण्याची तुमची इच्छा निर्माण होते.

Share This News

Related Post

Upgrade Your Fashion Style : या थंडीमध्ये तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत हे कपडे आणि ॲक्सेसरीज !

Posted by - October 7, 2022 0
फॅशन म्हणजे नक्की काय ? असा प्रश्न आजपर्यंत तुम्ही खरंतर स्वतःला विचारला असणार आहे. बऱ्याच वेळा काही जणांचा फॅशन सेन्स…

Met Gala 2022 मध्ये नताशाचा गोल्डन लूक, नताशा आहेत अदार पूनावाला यांच्या पत्नी

Posted by - May 4, 2022 0
फॅशनचा सर्वात मोठा कार्यक्रम असलेला Met Gala 2022 सुरू झाला आहे. भारतीय सोशलाइट आणि व्यावसायिक महिला नताशा पूनावाला यांनी मेट…
Pune Crime News

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

Posted by - February 7, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune Crime News) एका हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या…

जिओकडून “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर

Posted by - March 28, 2022 0
एका रिचार्जवर पूर्ण महिन्याची वैधता “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर करणारी जिओ पहिली टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ठरली आहे. या योजनेमध्ये…
Sex

Thoughts During Sex : सेक्स करून झाल्यानंतर मुले नेमका काय विचार करतात ?

Posted by - August 3, 2023 0
सेक्स केल्यानंतर पुरुष काय विचार (Thoughts During Sex) करतात? हे एक मोठे रहस्य आहे. ज्याचे उत्तर प्रत्येक स्त्रीला जाणून घ्यायची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *