जिओ ट्रू 5G पॉवर्ड वाय-फाय लाँच; आकाश अंबानी यांच्याकडून नाथद्वारामध्ये शुभारंभ

185 0

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (जिओ) ने आज जिओ ट्रू 5जी नेटवर्कवर चालणाऱ्या वाय-फाय सेवा सुरू केल्या आहेत. ही सेवा शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बस स्टँड, व्यावसायिक हब अशा ठिकाणी दिली जाईल जिथे लोकांची मोठी गर्दी असते. जिओ ट्रू 5जी समर्थित वाय-फाय आज राजस्थानमधील नाथद्वारा या पवित्र शहरातून लॉन्च करण्यात आले.

जिओ वापरकर्त्यांना जिओ वेलकम ऑफर कालावधीत ही नवीन वाय-फाय सेवा मोफत मिळेल. इतर नेटवर्क वापरणारे देखील जिओ 5जी समर्थित वाय फाय चा मर्यादित वापर करू शकतील. पण जर त्यांना जिओ 5G पॉवर्ड वाय फाय ची पूर्ण सेवा वापरायची असेल तर त्यांना जिओ चे ग्राहक बनावे लागेल. विशेष म्हणजे जिओ ट्रू 5G वाय फाय शी कनेक्ट होण्यासाठी ग्राहकाकडे 5G हँडसेट असणे आवश्यक नाही. तो 4G हँडसेटवरूनही या सेवेशी कनेक्ट होऊ शकतो.

जिओ ट्रू 5G समर्थित सेवेसोबत, जिओची ट्रू 5G सेवा देखील नाथद्वारा आणि चेन्नई येथे सुरू झाली आहे. अलीकडेच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथेही 5G सेवा सुरू करण्यात आली. इतर शहरांमध्ये लवकरच जिओ 5G सेवा सुरू करण्यासाठी आणि ट्रू 5G हँडसेटची उपलब्धता वाढवण्यासाठी जिओ टीम चोवीस तास काम करत आहेत.

देशवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देताना आकाश अंबानी म्हणाले, “भगवान श्रीनाथजींच्या आशीर्वादाने आज नाथद्वारामध्ये जिओ ट्रू 5 G च्या सेवेसह 5G पॉवरवर चालणारी वायफाय सेवा सुरू होत आहे. आमचा असा विश्वास आहे की 5G सर्वांसाठी आहे, त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की जिओची ट्रू 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी सारख्या देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यान्वित व्हावी. श्रीनाथजींच्या आशीर्वादाने नाथद्वारा आणि चेन्नई ही आजपासून जिओ ट्रू 5G शहरे बनली आहेत.”

नाथद्वारा हे राजस्थानमधील पहिले शहर आहे जेथे कोणत्याही ऑपरेटरने 5G सेवा सुरू केली आहे. तथापि, कंपनीने अद्याप व्यावसायिक लॉन्चची घोषणा केलेली नाही. त्याचबरोबर दक्षिण भारतातील चेन्नई शहर देखील कंपनीच्या 5G सेवा नकाशावर आले आहे.

 

Share This News

Related Post

#PUNE : पुण्यातील चांदणी चौकाचे 1 मे ला होणार लोकार्पण !

Posted by - March 13, 2023 0
पुणे : 2 ऑक्टोबर या दिवशी चांदणी चौकातील पूल ब्लास्ट करून पाडण्यात आला होता. या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून पुणेकरांनी प्रचंड…
Ranjit Taware

Pune District Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदी रणजीत तावरे यांची नियुक्ती

Posted by - November 8, 2023 0
पुणे : अजित पवारांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे…

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येचे गूढ उकलले; पतीनेच केला खून

Posted by - February 5, 2022 0
नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणाचे गूढ अखेर उलगडले आहे. पोलिसांना कारमध्ये जळालेल्या हाडांचा ‘डीएनए’ अहवाल मिळालेला असून, ही हाडे डॉ.…

टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत

Posted by - August 8, 2022 0
पुणे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या…

Special Report : वादाच्या भोवऱ्यात सापडणारी नृत्यांगना गौतमी पाटीलची कहाणी ! कसा आहे तिचा आतापर्यंतचा प्रवास

Posted by - January 11, 2023 0
अनेक लावणी कलाकार तिच्यावर नाराज आहेत. लावणीच्या परंपरेला गालबोट लावण्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. अशी कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी ती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *