वास्तू तथास्तु…! घरात अस्वस्थ वाटते आहे ? ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा , घराला येईल घरपण… 

192 0

वास्तू तथास्तु…! घरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाला वाटत असतं की , घराने आपल्याला आपलंसं करून घ्यावं.  अर्थात त्या घरामध्ये आपलेपणा वाटावा ,आराम मिळावा . पण अनेक जण घरामध्ये गेल्यानंतर अस्वस्थता जाणवते अशी तक्रार करतात. तर मग असं का होतं ? याला अनेक कारणे आहेत. काही सामान्य टिप्स फॉलो करून तुम्ही घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करू शकता .

1. सकाळी लवकर उठा आणि हलका व्यायाम अवश्य करा , घरामध्ये योगा किंवा बाहेर जाऊन वॉक करा.
2. तुम्ही जर नोकरी करणारे असाल तर घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊ शकेल अशी एखादी स्त्री कामाला घरामध्ये लावा. जेणेकरून घराची योग्य वेळी योग्य पद्धतीने स्वच्छता होत राहील. घर दिवसातून एक वेळा कानाकोपऱ्यातून स्वच्छ झाडून आणि पुसून घ्या. घर पुसून घेताना त्या पाण्यामध्ये सुगंधी द्रव्य ,फिनाईल ,खडीमीठ ,गोमूत्र ,हळद या वस्तूंचा अवश्य वापर करा.
3.आठवड्यातून एकदा घर डीप क्लीन करा
4.अंगावर घालायचे कपडे हे नेहमी स्वच्छ धुतलेले ,स्वच्छ ड्राय केलेले ,सुगंधित असावेत . ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
5. घरात प्रवेश केल्यानंतर तुमचा हॉल हा नेहमी स्वच्छ ,टापटीप आणि मोकळा ठेवा. जेणेकरून घरात प्रवेश केल्यानंतर मनावर आलेली मरगळ दूर होऊ शकेल.
6. बेडरूम मधील अंथरूण आणि पांघरून सकाळी उठल्यानंतर लगेचच घडी घालून योग्य ठिकाणी ठेवावेत. लक्षात ठेवा रोजच्या रोज अंथरूण उचललीच गेली पाहिजेत.
7. घरामध्ये दुर्गंधी येणार नाही, याची काळजी घ्या. ओले कपडे ,जास्त वेळ साचवून राहिलेले फळभाज्या योग्य वेळी साफ करत रहा.
8. रोज गरम पाण्याच्या अंघोळीमध्ये अर्धा चमचा मीठ घाला ,तुम्हाला तरतरी येईल.
9. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमच्या देवघराची स्थापना करा. रोज पूजा शक्य नसली तरीही देवाची फुले बदलून ,देवासमोर दिवा आणि उदबत्ती सकाळ संध्याकाळ लावा . तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक घरामध्ये देवासमोर असणारा दिवा आणि अगरबत्ती घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करते ,म्हणून स्वतःच्या चांगल्या मनस्थितीसाठी हा प्रयोग अवश्य करून पहा.
10.घरासमोर दारामध्ये रोज रांगोळी काढायला जमत नसेल तरी कमीत कमी दारात घाण राहणार नाही याची काळजी घ्या. घरासोबत अंगण देखील साफ करा.
11. घरामध्ये अधिक पाणी किंवा सूर्यप्रकाश लागणार नाही अशी रोपे लावा . म्हणजे त्याची अधिक काळजी घेतली नाही तरीही घरामधील ही रोपे वातावरण फ्रेश ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतात.
12. घरात हॉल किंवा बेडरूममध्ये आपल्या हयात नसलेल्या नातेवाईकांचे फोटो लावू नका ,लक्षात ठेवा गरुड पुराणानुसार त्या व्यक्तींची फोटो घरामध्ये लावणे हे तुम्हाला त्यांची आठवण देण्यापेक्षा गेलेल्या त्या व्यक्तींना अधिक त्रासदायक असतात ,असे मानले जाते . त्या व्यतिरिक्त घरातील जो भाग तुम्ही देवाची पूजा आणि ध्यानधारणेसाठी वापरतात अशा ठिकाणी फोटो लावल्यास हरकत नाही . परंतु टाळल्यास अधिक चांगले . त्यांची स्मृती मनामध्ये ठेवा
13. घरामध्ये पूजा झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी घराच्या कानाकोपऱ्यात आवाज घुमू शकेल असा घंटा नाद करा . घरातील देवाजवळ असणारी छोटी घंटा घेऊन घरातील कानाकोपऱ्यामध्ये उदबत्ती फिरवून घंटा नाद करा.  घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल .

अशा आणखी काही टिप्स घेऊन आम्ही पुन्हा परत येऊ या टिप्स घरामध्ये केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…

Share This News

Related Post

लता मंगेशकर का राहिल्या आजीवन अविवाहित ? वाचा अधुरी एक प्रेम कहाणी

Posted by - February 6, 2022 0
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मागील दिवसांपासून त्या ब्रीच कँडी उपचार घेत होत्या. अखेर आज…

कुख्यात गुंड गजा मारणे ची नागपूर कारागृहातून सुटका

Posted by - March 7, 2022 0
नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे ची कारागृहातून सुटका झाली आहे.गजा मारणेला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्ष स्थानबद्ध…

#VIRAL VIDEO : लग्नाच्या मंडपात नवरदेवाने केले असे कृत्य, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही

Posted by - March 27, 2023 0
व्हायरल व्हिडिओ : सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. यासाठी सोशल मीडियावर दररोज लग्नाशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यातील…
Emotional Affair

Emotional Affair : इमोशनल अफेयर म्हणजे काय? त्याचा वैवाहिक जीवनावर कसा होतो परिणाम

Posted by - August 11, 2023 0
आपल्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, ज्यावेळी आपल्याला एका जोडीदाराची गरज असते. अशा परिस्थितीत प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी एक साथीदार आवश्यक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *