Emotional Affair

Emotional Affair : इमोशनल अफेयर म्हणजे काय? त्याचा वैवाहिक जीवनावर कसा होतो परिणाम

370 0

आपल्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, ज्यावेळी आपल्याला एका जोडीदाराची गरज असते. अशा परिस्थितीत प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी एक साथीदार आवश्यक असतो. मात्र काहीवेळा लोक त्यांच्या गरजांमुळे संबंध खराब करतात. जीवनाचा आनंद घेण्यासाठी ते दुसऱ्या व्यक्तीशी भावनिकरित्या संबंध जोडू लागतात. हे इमोशनल अफेयरचं (Emotional Affair) कारण बनतं.

आता तुम्ही म्हणाल की इमोशनल अफेयर चुकीचं आहे का? जर तुम्ही सिंगल असाल किंवा कोणाशीही कमिटेड नसाल तर इमोशनल अफेयर जोडणं चुकीचं मानलं जात नाही. पण जर तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुम्ही इमोशनल अफेयर ( Emotional Affair) जोडण्याचा विचार कराल तर मात्र ते चुकीचे आहे.

इमोशनल अफेयर म्हणजे काय?
इमोशनल अफेयर ( Emotional Affair ) मध्ये एखाद्या व्यक्तीच्या भावना एखाद्या व्यक्तीशी जोडू लागतात. हे त्यावेळी होऊ लागतं जेव्हा ते त्या व्यक्तीसोबत असतात किंवा जवळ असतात. यावेळी त्या संबंधित व्यक्तीला अधिकाधिक वेळ द्यायला आवडू लागतं. इमोशनल अफेयरमध्ये ( Emotional Affair ) एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध जोडणे आवश्यक नसते. यामध्ये व्यक्ती समोरच्याशी भावनिक नातं जोडून त्याला आपल्या दिनचर्येचा एका भाग बनवते.

वैवाहिक जीवनावर याचा काय परिणाम होतो?
कोणत्याही व्यक्तीशी भावनिक संबंध जोडणं अजिबात चुकीचं नसलं तरीही तुम्ही आधीच नात्यात बांधले असाल तर तुमच्या जोडीदाराला याची माहिती असणं आवश्यक आहे. भावनिक नातं जोडल्यानंतर लोक आपल्या जोडीदाराचा कंटाळा करू लागतात. ते समोरच्या दुसऱ्या व्यक्तीला अधिकाधिक वेळ देऊ लागतात. ज्यामुळे जोडप्यांमध्ये अंतर निर्माण होऊ लागतं. या गोष्टी एखाद्या नात्यातील एखाद्याला फसवण्यासारख्या आहेत.

इमोशनल अफेयरमध्ये आहोत हे कसं ओळखावं?
एकट्याने वेळ घालवण्याची कारणं शोधता – जर एखादी व्यक्ती इमोशनल अफेयरमध्ये अडकली असेल तर तो अधिकाधिक वेळ एकट्याने घालवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो समोरच्या व्यक्तीला जास्त वेळ देऊ शकत नाही.

पार्टनरपेक्षा समोरच्या व्यक्तीचा विचार- एखादी व्यक्ती इमोशनल अफेयरमध्ये इतकी गुंतते की, आपल्या रिलेशनशिपच्या प्रत्येक बाबतीत जोडीदारापेक्षा समोरच्या व्यक्तीचा विचार अधिक वेळा डोक्यात येतो.

Share This News

Related Post

झुंड चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Posted by - March 6, 2022 0
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताचं प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन…

महिलांना आवडत नाहीत पुरुषांमधील ‘या’ सवयी ; नात्यामध्ये सतत येत असेल कडवटपणा तर हा लेख नक्की वाचा

Posted by - January 13, 2023 0
आज मोठ्या प्रमाणावर पती-पत्नीच्या नात्यांमध्ये होणारी ताटातूट असो किंवा अगदी नवख्या प्रेमामध्ये देखील सहज एकमेकांमध्ये येणारे अंतर असो . पुरुषांमधल्या…
Sex Hormones

Sex Hormones : पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स कमी झाले आहेत ‘हे’ कसे समजते?

Posted by - August 7, 2023 0
प्रत्येकाच्या शरीरात सेक्स हार्मोन्स (Sex Hormones) असतात. जर शरीरात यांची कमी झाली की त्याची लक्षणं देखील दिसून येतात. पुरुषांमध्ये सेक्स…

फेक कॉल करणाऱ्यांनो सावधान ! आता तुमचे नाव लपून राहणार नाही !

Posted by - May 21, 2022 0
नवी दिल्ली- जेंव्हा अननोन नंबरवरून कॉल आला की तुमच्या स्क्रीनवर फक्त त्याचा नंबर दिसतो. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांचे चांगलेच फावते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *