JioPhone Next फक्त २१६ रुपयात घेऊन जा घरी

244 0

नवी दिल्ली : Reliance Jio ने सादर केलेला ioPhone Next घरी घेऊन जाण्यासाठी आता फक्त २१६ रुपये द्यावे लागणार आहेत. बाकी पैसे ईएमआय द्वारे भरू शकता. हा फोन तुम्ही ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. काय आहेत JioPhone Next स्मार्टफोनवरील ऑफर्स

Reliance Jio ने गेल्यावर्षी JioPhone Next ला लाँच केले होते. मात्र या फोनची किंमत समोर आल्यानंतर यूजर्सची निराशा झाली होती. Jio ने फोनला खरेदीसाठी वेगवेगळे ईएमआय पर्याय दिले होते. मात्र, ईएमआयवर खरेदी केल्यावर फोनची किंमत १४ हजार रुपयांच्या पुढे जाते.

JioPhone Next सध्या ई-कॉमर्स साइट Amazon India वर फक्त ४५९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनला कंपनीने ६,४९९ रुपये किंमतीत लाँच केले होते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहक या फोनला फक्त ४,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकतात. यासाठी यूजर्सला जूना फोन देऊन एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यावा लागेल. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. फोनला खरेदी करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कारण आता फोन ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.

JioPhone Next चे फीचर्स

लक्षात घ्या की JioPhone Next कॅरियर-लॉकसह येतो. याचा अर्थ फोनमध्ये तुम्ही दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड वापरू शकत नाही. यात केवळ जिओचे सिम कार्ड काम करेल. JioPhone नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१५ SoC सह येतो. यात २ जीबीपर्यंत रॅम आणि ३२ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा फोन Pragati OS वर काम करतो. या ओएसला खासकरून भारतीय यूजर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी ३५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. तर सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Share This News

Related Post

अमिताभ-रश्मिकाच्या ‘गुडबाय’ चित्रपटाचा फर्स्ट लूक ; चाहत्यांमध्ये उत्सुकता

Posted by - September 3, 2022 0
मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये बॉयकॉटचे वादळ सुरू आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते आणि कलाकारांमध्ये देखील धाकधूक सुरूच आहे. मोठे चित्रपट वाईट…

उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणाचा कुऱ्हाडीने वार करत खून

Posted by - April 6, 2022 0
पुणे- उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत खून करण्यात आला. ही घटना फुरसुंगीतील…
Baipan Bhari Deva

Baipan Bhaari Deva : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला पडली ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची भुरळ!

Posted by - August 7, 2023 0
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं आहे. फक्त महिलाच नाही तर…
Mugdha Vaishampayan

Video Viral : मुग्धा वैशंपायनच्या लग्नावर प्रसिद्ध अभिनेत्याने दिलेल्या ‘त्या’ प्रतिक्रियेचा व्हिडीओ व्हायरल

Posted by - June 24, 2023 0
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी अलीकडेच त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. मागच्या 4…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *