संकष्टी चतुर्थी : आज श्री गणेशाची अशी करा पूजा ; हातातोंडाशी आलेल्या कामातील अडसर होईल दूर

217 0

संकष्टी चतुर्थी विशेष : आज संकष्टी चतुर्थी आहे श्री गणेश भक्त 5 मनोभावे उपवास आणि पूजा करतात असे मानले जाते की आजच्या दिवशी अर्थात महिन्यातून येणाऱ्या दोन चतुर्थी जो भक्त मनोभावे उपवास करून व्रतवैकल्य करून मनोभावे पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कोणत्याही कामांमध्ये येणारे अडसर दूर होण्यासाठी गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतो. 

तर आज दिवसभरामध्ये केव्हाही मनोभावे श्री गणेशा समोर आपल्या मनातली इच्छा नक्की बोला… श्री गणेश ही देवता विघ्नहर्ता आहे. कोणतेही काम करताना हातातोंडाशी आले की काम बिघडते ,कोणतेही काम सहजासहजी पूर्ण होत नाही ,किंवा कोणतेही काम मनासारखे होत नाही, अशी कोणतीही संकट जर तुम्हाला येत असतील तर या विघ्नहर्त्याची चतुर्थीची उपासना आवश्यक करा.

चतुर्थीच्या दिवशी चतुर्भुज होऊन स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील श्री गणेशाला पूजून लाल फुल अवश्य अर्पण करावेत. घरामध्ये गणपती अथर्वशीर्ष रोज म्हटल्याने किंवा ऐकल्याने घरातील वातावरण शांत आणि निर्मळ राहते. मनावरील ताण देखील कमी होतो. आपल्या पाठीशी श्री गणेशाचा आशीर्वाद आहे अशी अनुभूती होते.

रोज अगदी काम करताना गणपती अथर्वशीर्ष ऐकले तरीही चालेल. चतुर्थीच्या दिवशी स्वतः गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. घरातील गणपती समोर किंवा गणपती मंदिरामध्ये विड्याचे पान आणि सुपारी ठेवावी. त्यासह जमतील तसे मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. श्री गणेशाला उकडीचे मोदक आवडतात असे मानले जाते.

लक्षात ठेवा कोणत्याही देवाची पूजा ही मनाला एक शक्ती मिळवून देत असते. घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर मंदिरात तेवणारा दिवा आणि उदबत्तीच्या सुवासाने घराला एक प्रकारचे निर्मळ वातावरण प्राप्त होते. त्यामुळे घरातील व्यक्ती शांत आणि समजूतदार होते. आजच्या दिवशी श्री गणेश सर्व भक्तांवर आपली कृपा करून सर्व विघ्न दूर करो अशीच प्रार्थना…!

Share This News

Related Post

RASHIBHAVISHY

मेष राशीच्या लोकहो…! इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका; वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Posted by - December 19, 2022 0
मेष रास : आज तुमचा वेळ इतरांवर टीका करण्यात घालवू नका. यामुळे लोक तुमच्याबद्दल केवळ नकारात्मक विचार करतील. चांगले संबंध…

रोज तिन्हीसांजेला घरात ऐका ‘हे’ श्लोक; दुःख-दारिद्र्य निवारण, मानसिक सुख आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी सर्वोत्तम उपाय

Posted by - November 10, 2022 0
बऱ्याच वेळा घरामध्ये सगळं काही असतं. संपत्ती,संतती,समृद्धी पण मानसिक शांती मात्र नसते. कधी कधी एक संकट सुरू झालं की त्या…
RASHIBHAVISHY

मेष राशीच्या लोकांनी आज वाहन चालवताना काळजी घ्या; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - November 16, 2022 0
मेष रास : आजचा दिवस थोडा कठीण जाण्याची शक्यता आहे विनाकारण मन अस्वस्थ होईल घरात कोणाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे…
Shanidev

शनीपासून होणारी साडेसाती टाळण्यासाठी करा ‘हा’ उपाय

Posted by - June 10, 2023 0
शनिदेवाच्या आशीर्वादाने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. तर दुसरीकडे, अशुभ शनि अनेक कठीण प्रसंगांना जन्म देतो. विशेषत: कुंडलीत शनीची…

या वर्षी किती साथ देणार नशीब ? वाचा तुमचे वार्षिक राशी भविष्य

Posted by - December 31, 2022 0
मेष मेष राशि : 2023 हे वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी खूप महत्वाचे असणार आहे कारण, तुम्हाला 3 प्रमुख ग्रहांच्या संक्रमणाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *