तिरुपती बालाजी देवस्थानने प्रथमच जाहीर केली संपत्ती; किती टन सोनं, ठेवी, मालमत्ता ? पाहा

558 0

तिरुपती बालाजी : देशभरातील प्रसिद्ध असलेल्या मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचं नाव नेहमीच घेतलं जातं.तिरुमला तिरुपती देवस्थानने प्रथमच खुलासा करत मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. आता तुम्हालाही उत्सुकता निर्माण झाली असेलच की मंदिराकडे एकूण किती टन सोने, रोख रक्कम आणि इतर मालमत्ता आहे. 

तिरुमला तिरुपती देवस्थानमने 1933 मध्ये स्थापनेनंतर पहिल्यांदाच संपत्तीची घोषणा केली आहे.दक्षिण भारतातील सर्व मंदिरे ही त्यांच्या सौंदर्यामुळे खूपच प्रसिद्ध असतात. त्यापैकी एक असलेले तिरुपती बालाजी मंदिर आहे. तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मंदिर न्यासाच्या बोर्डाने 2019 पासून आपली गुंतवणूक आणि गाईडलाईन्स आणखी मजबूत केल्या आहेत.मंदिर ट्रस्टकडे सध्या 10.3 टन सोने आहे. जे राष्ट्रीयकृत बँकेत डिपॉझिट करण्यात आले आहे.

या सोन्याची किंमत सध्याच्या बाजार भावानुसार अंदाजे 5300 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. यामध्ये 2.5 टन सोन्याचे दागिने आहेत, त्यापैकी अनेक पुरातन वस्तू सुद्धा आहेत.ट्रस्टने खुलासा केलेल्या माहितीनुसार, बँकांमध्ये ट्रस्टच्या मोठ्या ठेवी आहेत. सुमारे 16000 कोटी रुपये बँकांमध्ये ठेवी असल्याची माहिती समोर आली आहे. तिरुपती देवस्थानने त्यांच्याकडे असलेल्या १०.२५ टन सोन्यापैकी ९.८ टन सोने स्टेट बँक ऑफ इंडियाकडे तर बाकीचे सोने इंडियन ओव्हरसीज बँकेत ठेवले आहे. या देवस्थानकडून महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा, हरयाणा, आंध्र प्रदेश येथील अनेक मंदिरांची देखभाल केली जाते. टीटीडीचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा सांगतात, मंदिर ट्रस्टची एकूण संपत्ती 2.26 लाख कोटी झाली आहे.

2019 मध्ये मंदिर ट्रस्टकडे 13,025 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. यामध्ये आता वाढ होऊन 15 हजार 938 कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली असून आता गुंतवणुकीत 2900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2019 मध्ये ट्रस्टकडे 7339.74 टन सोने होते. यामध्ये वाढ होऊन आता 2.9 टन इतके सोने झाले आहे. तिरुमला तिरुपती मंदिरात भाविक भरभरून दान करत असतात. यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदीच्या दागिन्यांसह इतरही मौल्यवान वस्तूंचा समावेश असतो. मंदिर ट्रस्टकडे वेगवेगळ्या ठिकाणी 7 हजार 123 एकर इतक्या परिसरात एकूण 960 स्थावर मालमत्ता आहेत.

मंदिर ट्रस्टने सरप्लस फंड म्हणजेच अतिरिक्त निधी हा केवळ बँकांमध्येच गुंतवलेला आहे. कोणत्याही प्रकारच्या खोट्या वृत्तांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका. मंदिर ट्रस्टने आपल्याकडील रोख रक्कम, सोने हे बँकेत ठेवले असून सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचं मंदिर ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

Bhiwandi Crime

डॉक्टरांचा हलगर्जीपणा ! चुकीचे इंजेक्शन दिल्याने चिमुरडीचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

Posted by - June 14, 2023 0
भिवंडी : भिवंडीमध्ये (Bhiwandi) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चुकीचे इंजेक्शन (Wrong Injection) दिल्यामुळे चार वर्षीय…
Jalgaon Death

काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं! वडिलांच्या पाठोपाठ आठ महिन्यात चिमुकल्याने देखील सोडले प्राण

Posted by - June 13, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेचा पहिला दिवस एका विद्यार्थ्याच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला…

VIDEO : खाते वाटप लवकरच होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - August 12, 2022 0
नागपूर : आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी खाते वाटप आणि इतर विषयावर स्पष्टीकरण…

लतादीदींनी ज्या न्युमोनियाशी झुंज दिली तो वयोवृद्धांसाठी किती घातक आहे ? जाणून घ्या

Posted by - February 7, 2022 0
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी तर कोविडमधून बरे झालेले रुग्ण नंतर न्यूमोनियाचे बळी ठरल्याचीही…
Medha Kulkarni

Medha Kulkarni : भाजप मेधा कुलकर्णीची नाराजी करणार दूर; उद्घाटनानंतर नितिन गडकरी त्यांची निवासस्थानी घेणार भेट

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे.त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते.त्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *