Shooting Star

Shooting Star: तारा तुटल्याचे दिसल्यावर खरंच मनातील इच्छा पूर्ण होते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

5776 0

मुंबई : तुम्ही आकाशात कधीतरी तुटलेला, पडणारा तारा (Shooting Star) पाहिलाच असेल. हा पडणारा तारा पाहून अनेकजण आपली मनातील इच्छा व्यक्त करतात. आपल्याकडे पूर्वीपासून असा समाज आहे कि पडणारा तारा (Shooting Star) पाहून व्यक्त केलेली इच्छा सहज पूर्ण होते. याला काहीजण अंधश्रद्धादेखील समजतात. मात्र पडणारा तारा (Shooting Star) पाहणे खरोखरच दुर्मिळ असते. त्यामुळे तुटलेला तारा पाहणारे स्वतःला भाग्यवान समजतात. परंतु पडणारा तारा दिसल्याने खरोखर काही शुभ होते का? किंवा कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण होते का? चला तर मग आज जाणून घेऊया यामागचे वैज्ञानिक-ज्योतिषीय कारण..

Gold Scheme : स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक

पडणाऱ्या ताऱ्यांबद्दल पूर्वीपासून चालत आलेली समजूत
1. पूर्वीच्या काळी लोक रात्रीच्या वेळी तारे पाहून दिशा ठरवत होते आणि अनेक अंदाज सुद्धा लावत होते. प्राचीन लोकांच्या मते, पडणारा तारा पाहिल्यास एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बदल होतो.
2. पडणारा तारा पाहणे नेहमीच चांगले असते, असे म्हणता येणार नाही. अनेक लोक तुटलेल्या ताऱ्यांकडून इच्छा मागणे अशुभ मानतात. प्राचीन काळी, वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक दिशा निर्देशक म्हणून ताऱ्यांचा उपयोग करत होते.
3. प्राचीन काळी लोक ताऱ्यांकडे पाहून पिकांचा अंदाज लावत असत. काही लोकांचा असा विश्वास आहे की, पडणारा तारा देवता, शुद्धीकरण आणि विश्वाशी संबंधित रहस्ये प्रकट करतो.
4. प्राचीन काळी, काही लोकांचा असादेखील विश्वास होता की पडणारे तारे नवीन आत्मे असतात, जे जन्म घेण्यासाठी आकाशातून पृथ्वीवर येत आहेत. तर काहींचा असा विश्वास आहे की, पडणारे तारे मृतात्मे आहेत, जे आपल्याला आठवण करून देतात की ते अजूनही येथे आहेत.

Liver Donate : पोरीने ऋण फेडले! बापाला यकृत दान करून मरणाच्या दारातून माघारी आणले

तुटलेल्या ताऱ्याचे वैज्ञानिक कारण (Scientific Reason)
पडणारा तारा (Shooting Star) आकाशात उडताना दिसतो, पण प्रत्यक्षात तो तारा नसतो. तो आकाशातील खडकाचा किंवा धुळीचा एक छोटा तुकडा असतो जो अवकाशातून येतो आणि पृथ्वीच्या वातावरणाशी आदळतो. जेव्हा हा खडक पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा घर्षणामुळे तो जळू लागतो. त्यामुळे त्याला चमक निर्माण होते. खगोलशास्त्रज्ञ या ताऱ्याला उल्का म्हणतात. बहुतेक उल्का पृथ्वीच्या वातावरणात जळतात आणि जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत, परंतु काही वेळा काही उल्का इतक्या मोठ्या असतात की पृथ्वीच्या वातावरणातील घर्षणादरम्यान त्या पूर्णपणे जळत नाहीत आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पडतात. त्यांना उल्का पिंड असे म्हंटले जाते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. टॉप न्यूज मराठी याचा कोणताही पाठपुरावा करत नाही)

Share This News

Related Post

आज गुड फ्रायडे, काय आहे गुड फ्रायडेचा इतिहास ?

Posted by - April 15, 2022 0
गुड फ्रायडे हा ख्रिश्चन समाजाचा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. गुड फ्रायडेला ‘होली फ्रायडे’ किंवा ‘ग्रेट फ्रायडे’ असेही म्हणतात. ख्रिश्चन…

आयकर भरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आयकर विभागाकडून नवीन सुविधा जाणून घ्या

Posted by - April 12, 2023 0
जर तुम्ही आयकर रिटर्न भरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आयकर विभागाचे काही नियम माहित असणे आवश्यक आहे. आयकर विभागाकडून…

कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधा म्हणजे काय ? जाणून घ्या महत्वाची माहिती

Posted by - April 18, 2022 0
भारतात बँकिंग क्षेत्रात वेगानं डिजिटलायझेशन झाल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्यांदा आपल्याला पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत होतं, नंतर एटीएम कार्डच्या रांगेत…

जिओ , एअरटेल, व्हीआय चे आकर्षक प्लॅन सादर, तुमच्यासाठी योग्य प्लॅन निवडा

Posted by - April 30, 2022 0
Jio, Airtel आणि VI (Voda-Idea) ने त्यांच्या ग्राहकांसाठी 30 दिवस आणि एक महिना वैधता असलेले प्लॅन लाँच केले आहेत. यापूर्वी,…

आज संकष्टी चतुर्थी; विघ्नहर्त्याला असे घाला साकडे, चंद्रोदय वेळ, उपाय , पूजा विधी, महत्व

Posted by - November 12, 2022 0
हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *