Shanidev

शनीपासून होणारी साडेसाती टाळण्यासाठी करा ‘हा’ उपाय

5893 0

शनिदेवाच्या आशीर्वादाने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. तर दुसरीकडे, अशुभ शनि अनेक कठीण प्रसंगांना जन्म देतो. विशेषत: कुंडलीत शनीची साडेसाती असेल तर आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कलियुगातील न्यायकर्ता आणि कर्मफलदाता म्हणण्यात आले आहे. शनीच्या या साडेसातीमुळे लोक खूप तणावात असतात. याच शनिदेवाच्या साडेसातीपासून रक्षण करण्यासाठी घोड्याची नाल अत्यंत प्रभावी मानली जाते. ती कशी वापरली जाते याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत…

घोड्याच्या नालेचा वापर
1) ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या घोड्याची नाल शनीची महादशा आणि त्याच्या प्रकोपापासून रक्षण करते. काळ्या घोड्याची नाल मोहरीच्या तेलात ठेवा आणि शमीच्या झाडाखाली गाडून टाका. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनीच्या सर्व समस्या दूर होऊन शनिदेवाची आपल्यावर कृपा राहते.

2) घराच्या मुख्य दारावर घोड्याची नाल टांगल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि घरातील सदस्यांचे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात. दारावर घोड्याची नाल टांगल्याने घरात सुख-शांती नांदते. घरामध्ये घोड्याची नाल लावल्याने शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.

3) जर तुम्ही नोकरी आणि व्यवसायामुळे त्रासलेले असाल तर बोटात घोड्याच्या नालीची अंगठी घाला. असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि नोकरी-व्यवसायाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

4) काळ्या घोड्याची खरी नाल तीच असते जी स्वतःहून घासून उतरलेली असते. केवळ अशा काळ्या घोड्याची नाल पूर्णपणे सक्रिय मानली जातो. काळ्या घोड्याच्या पुढच्या दोन पायांपैकी उजव्या बाजूला असलेली नाल सर्वोत्तम मानली जाते. त्याचा प्रभाव जास्तीत जास्त राहतो.

5) जे लोक शनिशी संबंधित व्यवसायात आहेत किंवा शनीच्या नकारात्मक प्रभावाने त्रस्त आहेत, अशा लोकांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर घोडीची नाल लावावी. काळ्या घोड्याच्या वेगवेगळ्या पायांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या ग्रहांच्या स्थितीनुसार पडतो.

(महत्वाची सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. टॉप न्यूज मराठी यापैकी कोणत्याच गोष्टीची हमी देत नाही)

Share This News

Related Post

आली दिवाळी…! उद्या आहे ‘वसुबारस’ ; वाचा महत्व, मान्यता, पूजा विधी, नंदिनी व्रत …

Posted by - October 20, 2022 0
गोवत्स द्वादशी हा एक हिंदू सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. जो दिवाळी उत्सवाची सुरुवात करतो, विशेषत: भारतीय महाराष्ट्र राज्यात, जिथे…
Ram Mandir

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Posted by - January 21, 2024 0
मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) होणार आहे. हा दिवस भारतीयांसाठी केवळ ऐतिहासिक असाच नाही, तर धर्मिकदृष्ट्या…

या वर्षी किती साथ देणार नशीब ? वाचा तुमचे वार्षिक राशी भविष्य

Posted by - December 31, 2022 0
मेष मेष राशि : 2023 हे वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी खूप महत्वाचे असणार आहे कारण, तुम्हाला 3 प्रमुख ग्रहांच्या संक्रमणाचा…
RASHIBHAVISHY

Today’s Horoscope : मीन राशीसाठी आजचा दिवस जवळच्या लोकांचे खरे चेहरे दाखवणारा; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - November 15, 2022 0
मेष रास : मेष राशीसाठी आजचा दिवस जीवनाच्या जोडीदारासाठी विशेष आहे आज जोडीदारासोबत विशेष दिवस व्यतीत कराल. एखादी घटना तुमच्या…
RASHIBHAVISHY

कुंभ राशीसाठी आजचा दिवस मन उल्हासित करणारा; आनंदी घटना घडेल ! वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Posted by - January 11, 2023 0
मेष रास : आज तुम्हाला तुमच्या सवयीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे. ही सवय आहे संकटांबाबत सातत्याने चर्चा करणे , आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *