Pithori Amavasya And Bailpola

Bhadrapad Amavasya 2023 : आज पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा!

6357 0

पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या असं म्हटलं जातं. आज भाद्रपद महिन्यातील (Bhadrapad Amavasya 2023) श्रावण कृष्ण पक्षातील पिठोरी किंवा दर्श अमावस्या आहे. पिठोरी अमावस्याला भाद्रपद अमावस्या असंही म्हणतात. पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील बैल पोळा हा शेवटचा सण मानला जातो. त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायचं आगमन होतं.

बैलपोळा कसा साजरा करतात?
बळीराजाचा लाडका बैल तो शेतात अहोरात्र राबत असतो तेव्हा त्याला धान्य पिकवण्यास मदत होते. त्यामुळे बैलाप्रती कृतज्ञता आणि प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात बैल पोळा हा सण साजरा केला जातो. विदर्भात बैल पोळाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबरला तान्हा पोळा साजरा करण्याची प्रथा आहे. लहान मुलं लाडकीच्या बैलाला सजवून दारोदारो आपले बैल घेऊन जातात. यादिवशी अनेक ठिकाणी बैलाला सजविण्याची स्पर्धा आयोजित केली जाते.

अमावस्या तिथी
पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची अमावस्या तिथी 14 सप्टेंबर 2023 ला पहाटे 4 वाजून 48 मिनिटांपासून सुरू झाली आहे. तर 15 सप्टेंबर 2023 ला सकाळी 7 वाजून 9 मिनिटापर्यंत असणार आहे.

पिठोरी अमावस्याला पूजा कशी करावी
या अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात. घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात. ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते. अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो. याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात.

(टीप : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. टॉप न्यूज मराठी या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

Share This News

Related Post

Pitru Paksha 2023

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?

Posted by - September 29, 2023 0
मुंबई : आजपासून पितृपक्षाला (Pitru Paksha 2023) सुरुवात होत आहे. 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येपर्यंत श्राद्धविधी केले जातील. या काळात पूर्वजांचे…
Basil

Basil Effect : तुळशीच्या भांड्यात ‘ही’ गोष्ट ठेवल्याने कधीही भासणार नाही पैशांची चणचण

Posted by - July 21, 2023 0
मुंबई : हिंदू धर्मात तुळशीला (Basil Effect) अनन्यसाधारण महत्व आहे. घरामध्ये तुळशीचे (Basil Effect) रोप लावून त्याची पूजा केल्याने आपल्याला…
Shri Ram Chalisa

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Posted by - January 21, 2024 0
22 जानेवारीला दुपारी राम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना (Shri Ram Chalisa) केली जाणार आहे. रामनामाचा रोज जप केल्यानं वासना, क्रोध,…
RASHIBHAVISHY

कन्या रास सावध रहा ! तुमच्या वाईट सवयींमुळे वाईट घटना घडू शकते…वाचा तुमचे राशी भविष्य

Posted by - December 9, 2022 0
मेष रास : आज मेष राशीसाठी मनासारखे जगण्याचा दिवस आहे आज ऑफिस मधून वेळेत बाहेर पडाल.  शनिवार रविवार कुटुंबीयांसोबत छान…
RASHIBHAVISHY

मेष राशीच्या लोकहो…! इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका; वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Posted by - December 19, 2022 0
मेष रास : आज तुमचा वेळ इतरांवर टीका करण्यात घालवू नका. यामुळे लोक तुमच्याबद्दल केवळ नकारात्मक विचार करतील. चांगले संबंध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *