हृदयविकाराचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांना का असतो ? जाणून घ्या कारणं

266 0

आजची जीवन जगण्याची पद्धत ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहे आणि त्यात शहरीभागातील तर अजुनच वेगळी आहे. आजच्या धावत्या युगात बहुतांश कामं हे मशीनच करत असतात. नोकरी करत असलेल्या व्यक्तीचं कामाचं प्रमाण खूप वाढले आहे.चालणे खूप कमी झालं आहे, कामाच्या व्यापामुळे तर कित्येकजणांना पुरेशी झोपही मिळत नाही.त्याचा सरळ परिणाम हा आरोग्यावर होताना दिसत आहे. मधुमेह ,हाय बीपी सारखे आजार त्यामुळे उध्दभवतात. सध्या हृदयावर ताण येऊन हृदयविकारचं प्रमाण खूप वाढले आहे. त्यामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळत आहे.

पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असण्याची कारणे

पुरुषांच्या तुलनेत जर बघायला गेलं तर स्त्रियांच्या शरीराची हालचाल जास्त असते.मग ती वर्किंग वूमन असो किंवा हाऊसवाईफ. पुरुषांच्या शरीराची हालचाल स्त्रियांच्या तुलनेत कमी बघायला मिळते. सतत लॅपटॉपवरती काम करताना असताना दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे ,तेलकट पदार्थांचे सतत सेवन करणे, अपुरी झोप यामुळे जीवनशैली विस्कळीत होते.तसेच लवकर ताण येणं,मद्यपान करणं ही प्रमुख कारणे आहेत.

पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये येणाऱ्या हृदयविकाराची लक्षणं सुद्धा वेगवेगळी असतात.पुरुषाला जर हृदयविकाराचा झटका येत असेल तर छातीत दुखणे,हात दुखणे,पाठीत मुंग्या येणे ही लक्षणं प्रामुख्याने असतात तर स्त्रियांमध्ये अस्वस्थ वाटणे,छाती गच्च होणे,मळमळ होणे ही लक्षणं दिसून येतात.

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

कुठल्याही गोष्टींचं नियोजन असणे खुप गरजेचे असते.आपली दैनंदिन कामं करत असतानाच आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये.असे म्हणतात की,आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली असते.आपले आरोग्य जर चांगले असेल तर कुठलेही काम आपण पार पाडू शकतो. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम खुप महत्वाचा आहे. चालणे किंवा सायकय चालवणे हा खुप चांगला आणि सोपा व्यायाम आहे.नियमित प्राणायाम करणे सुद्धा आरोग्यसाठी खुप चांगले आहे.प्राणायाम केल्याने एकाग्रता वाढते तसेच मन शांत राहते.त्यामुळे ताण कमी येतो व हृदयविकाराचा धोका कमी होतो. व्यायामासोबतच योग्य आहाराचे सेवन करणे खुप गरजेचे आहे.तेलकट पदार्थाचे सेवन टाळावे. फास्टफूड टाळावे,कोल्डड्रींक्स चे कमी प्रमाणात सेवन करावे.धूम्रपान करणे टाळावे. धूम्रपानामुळे हृदयाला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होतो. रक्ताच्या गाठी होऊन हृदयाला रक्त पुरवठा नीट होत नाही व त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व गोष्टींचे पालन करून आपली काळजी घेतली पाहिजे.

Share This News

Related Post

आनंदाची बातमी ! 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील होणार, मात्र मास्क अनिवार्य

Posted by - March 30, 2022 0
मुंबई- कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात चांगले यश येत…
Nanded News

Nanded News : नांदेड हळहळलं ! शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू

Posted by - September 12, 2023 0
नांदेड : नांदेडमधून (Nanded News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये शेतात गेलेल्या बाप लेकांचा तडफडून मृत्यू…
Ajit pawar And Dhananjay Munde

Lok Sabha Election 2024 : अजितदादा आणि धनंजय मुंडेंना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या व्यक्तीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ

Posted by - March 20, 2024 0
बीड : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) 1 महिन्यावर येऊन ठेपली आहे. देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्येक…
Latur News

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 9, 2024 0
लातूर : लातूरमधून (Latur News) अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये लातूरच्या माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *