Health Tips

Health Tips : रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ 5 सवयी लक्षात ठेवा; 15 दिवसांत वजन होईल कमी

671 0

आजची लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळं अनेकांमध्ये लठ्ठपणाची समस्या (Health Tips) तीव्र होत जात आहे. वजन कमी करण्यासाठी डायटिंग केले जाते. मात्र, अनेकदा डाएट आणि रोज व्यायाम करुनही वजन हवं तस कमी होत नाही.मात्र आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही तुमचे वजन झपाट्याने कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी रोज रात्री एक रुटीन फॉलो करा. जवळपास 15 दिवस हेच रुटिन फॉलो करा.तुमचे वजन झपाट्यात कमी होईल.

1) 7 नंतर जेवण करणे टाळा
जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर रात्री 7 वाजल्यानंतर चुकूनही जेवण करु नका. रात्री उशीरा जेवल्यानंतर जेवण पचवता येत नाही आणि लठ्ठपणा वाढतो. त्यामुळं आजच सातच्या आत जेवणाची सवय लावून घ्या. यामुळं तुमच्या वजनातही झपाट्याने बदल घडेल.

2) फायबरयुक्त पदार्थ खा
रात्रीच्या जेवणात नेहमीच लाइट आणि हेल्दी जेवण जेवले पाहिजे. फायबरयुक्त पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा. त्यामुळं रात्रीच्या जेवणात सलाड, सूप, डाळ, चपाती यांचा समावेश करा. यामुळं तुमचं पोट भरल्यासारखं राहिल आणि वजनही वाढणार नाही.

3) गरम पाणी पिण्याची सवय
तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर जेवून झाल्यानंतर गरम पाणी प्या. त्यामुळं आरामात जेवण पचते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

4) पुरेशी झोप घेणे गरजेचे
झोप पूर्ण न होणे आणि लठ्ठपणा याचा थेट संबंध आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे. तर रोज पुरेशी झोप घ्या. रोज आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.

5) हळदीचे दूध
वजन कमी करण्यासाठी हळदीचे दूध खूप फायदेशीर आहे. हळदीच्या दूधामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळं आजपासूनच हळदीचे दूध पिण्याची सवय लावून घ्या.

(टीप : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या) 

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Sleeping Positions

Sleeping Positions : बेडरुमधील रोमान्स अधिक रोमँटिक करायचा असेल तर ‘या’ 15 Sleeping Positions नक्की ट्राय करा

Posted by - August 10, 2023 0
जोडप्यामधील लैंगीक संबध अर्थात सेक्स (Sleeping Positions) हे प्रजनन वाढीसाठी खूप महत्वाचे असते. यामुळे एकमेकांसोबतची जवळीक प्रेम आणखी वाढते. नात्यामधील…

#Mental Health : जेव्हा उगाचच निराश वाटतं ! फक्त ‘हे’ हलकेफुलके बदल करून पहा, स्वतःची किंमत करायला शिकाल…

Posted by - February 16, 2023 0
बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण एकटे आहोत, उगाचच निराश झाल्यासारखं वाटतं, आजूबाजूच सगळं वातावरण भकास वाटायला लागतं, जर तुम्हालाही…

तुम्हीही चहाप्रेमी आहात का ? पण दिवसभरात किती चहा प्यावा हे देखील जाणून घ्या ! अन्यथा शरीरावर होतील घातक परिणाम…

Posted by - February 21, 2023 0
चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. असे अगदी बोटावर मोजण्याइतकेच लोक असावेत की ज्यांना चहा आवडत नाही. तर अनेकजण…

जागतिक सर्पदिन विशेष : सर्पदंश – काळजी आणि उपचार

Posted by - July 16, 2022 0
जागतिक सर्पदिन विशेष : सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्याची…

मद्यप्रेमींनो विकेंड आहे ,हँगओवर झाला आहे ? उतरवायचा असेल तर ‘हे’ आहेत प्रभावी घरगुती नुस्खे

Posted by - January 21, 2023 0
पार्टी झाल्यानंतर हँगओव्हर झाला असेल तर अनेक जणांना डोकेदुखी, उलट्या, मळमळ, पोट दुखणे अशा समस्या जाणवतात. विशेष करून वीकेंडला किंवा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *