पुणे, मुंबईसह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना

1823 0

पुणे:  मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत.

कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते.

पुनर्रचित टास्क फोर्स सदस्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. सावंत यांनी सदस्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

डॉ. सावंत म्हणाले, कोविड-१९ चाचण्यांची संख्या वाढवावी. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मॉकड्रीलमध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करावे. मास्कचा वापर करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोविड बाधितांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉलमध्ये समावेश नाही, असे यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. यावर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन टास्क फोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण झाल्यावर रुग्णांना ऑक्सिजनची विशेष गरज भासत नाही. पण संसर्ग पाहता कोविडची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

कोविड चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत का याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.

कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण जास्त जोखमीची नाही. लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हा संसर्ग पंधरा मेपासून कमी होऊ लागेल, असे सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितले.

Share This News

Related Post

व्यक्तीविशेष ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत करावा लागला होता पराभवाचा सामना

Posted by - April 14, 2022 0
1947 मध्ये गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त होऊन देश स्वतंत्र झाला. तेव्हा संविधान लिहिण्याचे मोठे आव्हान होते. आपली राज्यघटना कशी आहे? या…

#Valentine’s Day : प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? तुम्ही तुमच्या पार्टनरवर ‘अस’ प्रेम करता ! काव्हॅलेंटाईन डे विशेष मध्ये वाचा हा लेख

Posted by - February 13, 2023 0
व्हॅलेंटाईन डे आला की सर्वच जण प्रेमाविषयी बोलतात. पण नेमकं हे प्रेम म्हणजे काय असतं कधी विचार केलाय ? तसं…

महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचे निधन

Posted by - February 8, 2022 0
बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत काम करणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती (वय ७४) यांचे निधन झाले आहे. प्रवीण यांच्या…

जम्मू काश्मीरमध्ये राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना २४ तासात कंठस्नान

Posted by - May 13, 2022 0
जम्मू- जम्मू काश्मीरमध्ये आज भारतीय सुरक्षादलाने वचनपूर्ती केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी (दि. १२) राहुल भट्ट या काश्मिरी पंडित युवकाची…

#PUNE : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, ” माझ्याच घरात वाटले पैसे…!”

Posted by - February 27, 2023 0
पुणे : काल पुण्यात कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. ही पोट निवडणूक होण्याआधी आणि पार पडल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *