कडुलिंबाच्या पानांचे फायदे

442 0

कडुलिंबाची केवळ दोन पान तरी दररोज खावी असा सल्ला तुम्ही या आधी देखील नक्कीच ऐकला असेल, आणि ते तितकेच खरे देखील आहे. चवीला कडु असलेल्या कडुलिंबाच्या पानांमंध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म आहेत. अनेक प्रकारचे त्वचा रोग, दातांच्या सफाई साठी तसेच इतरही अनेक फायदे कडुलिंबामुळे होतात. आयुर्वेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले असून, थंडीत कडुलिंब शरीरासाठी फायदेशीर ठरते. साऊथ साईडचे लोक संक्रांती तसेच गुढीपाडवा सणाच्या काळात गुळाच्या पाण्यात कडुलिंब टाकुन काढा बनवतात. चला तर जाणुन घेऊ कडुलिंबाचे फायदे.

पोटामध्ये जंत झाल्यास

पोटांच्या आजारावर कडुलिंबाचा रस अतिशय गुणकारी ठरतो. अती गोड खाल्यास किंवा इतर कारणाने जंत झाल्यास कडुलिंबाच्या रसात मध आणि काळी मिरी घालुन पिल्यास पोटाचे विकार नाहीसे होण्यास मदत होते.

चेहऱ्यासाठी

चेहऱ्यावर येणारे फोड किंवा पुरळ यासाठी कडुलिंबाची पान, साल आणि फळ यांच्या एकत्रित मिश्रणाचा लेप लावल्यास चेहरा तजेलदार दिसतो. कारण कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्याने त्याचा फायदा होता. मात्र या सगळ्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील उत्तम.

कान आणि दातासाठी

दात स्वच्छ करण्यासाठी आजही अनेक लोक कडुलिंबाच्या झाडाची काठी वापरतात. यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तोंडाला जर दुर्गंधी येत असेत तर त्यापासून सुटका मिळते. तसेच अनेक टुथपेस्टमध्ये देखील कडुलिंब असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर कडुलिंबाचे तेल कानात टाकल्यास कानात येणारे पाणी किंवा कान दुखण्यापासून आराम मिळतो. कान हा संवेदनशील भाग असल्याने एकदा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

केसांसाठी

कडुनिंबाच्या कडवटपणा मुळे त्याचा जंतु किटाणु मारण्यासाठी उपयोग होतो. केसात कोंडा झाला असेल किंवा उवा झाल्या असतील तर अशावेळी कडुलिंबाचे तेल किंवा अंघोळीच्या पाण्यात उकळुन कडुलिंबाचा पाला टाकणे फायदेशीर ठरते.

त्वचेचे विकार

कडुलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे संसर्गजन्य त्वच्या रोगावर कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाणे टाकल्यास फायदा होतो. कारण कडुलिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.

या व्यतिरिक्त कांजण्या किंवा गोवर तसेच देवी सारख्या साथीच्या आजारांच्या वेळी घरगुती उपाय म्हणून कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकली जातात. कडुलिंब थंड असल्याने अंथरुणात अंगाखाली अशा वेळी कडुलिंबाची पान ठेवली जातात. डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी देखील कडुलिंबाचा रस फायदेशीर ठरतो. तांदळाला किड लागु नये, उंदरांपासून रक्षण करण्यासाठी सुकलेला कडुलिंबाचा पाला टाकला जातो. साठवणुकीच्या धान्यात कडुलिंबाचा पाल टाकल्याने वासाने किडे किंवा उंदीर घुशी त्यापासून दुर राहतात.

Share This News

Related Post

Hemangi Kavi

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Posted by - March 8, 2024 0
मुंबई : न्याय्य हक्क, समान अधिकारासाठी महिला चळवळींनी केलेल्या संघर्षाची आठवण म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त…
Health Tips

Health Tips : तुम्हाला पण दिवसा खूप झोप येते? ‘हे’ ट्राय करा ओव्हर स्लिपिंग संबंधित समस्या होईल दूर

Posted by - August 10, 2023 0
जास्त झोपणे आरोग्यासाठी (Health Tips) घातक ठरू शकते, अशा परिस्थितीत तुमच्या जीवनशैलीत काही सुधारणा करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू…

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू

Posted by - April 9, 2022 0
  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज दुपारी झालेल्या कारचा भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारनं उभ्या ट्रकला…
Disha Vakani

Disha Vakani : तब्बल 5 वर्षांनंतर चाहत्यांसमोर आली दया बेन! ओळखणेदेखील झाले कठीण

Posted by - July 26, 2023 0
मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मागच्या काही दिवसांपासून ही मालिका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *