Immunity

Immunity Boost : आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा ‘या’ 7 गोष्टी

438 0

आजारांपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची प्रतिकारशक्ती (Immunity Boost) कमकुवत असेल तर सर्दी, खोकला यासारख्या आजारांचा धोका वाढतो. तुमची इम्युनिटी सिस्टम शरीरातील अवयव, पांढऱ्या रक्त पेशी, प्रथिने (अँटीबॉडीज) आणि रसायनांचे मोठे जाळे असते. जे एकंदरीत बॅक्टेरिया, व्हायरस आणि परजीवीपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी कार्य करते. इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा याबद्दल जाणून घेणार आहोत…

रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यासाठी खा ‘या’ 7 गोष्टी
फळे खा
आहारात पपई, अननस, किवी किंवा सफरचंद यांसारखी फळे खा. या सर्व फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे रोग प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक असते.

लसूण फायदेशीर आहे
लसूण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. त्यात अ‍ॅलिसिन नावाचा घटक आढळतो जो शरीराला संसर्ग आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतो.

भरपूर खा पालक
पालकामध्ये फोलेट असते. यातील फायबर, आयर्न, व्हिटॅमिन सी शरीराला प्रत्येक प्रकारे निरोगी ठेवते. शरीरात नवीन पेशी तयार करण्यासोबतच ते डीएनए दुरुस्त करण्याचेही काम करते.

एक वाटी दही खा
इम्यूनिटी मजबूत करण्यासाठी दही सुद्धा उत्तम आहे. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

हळद सर्वोत्तम
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हळद फायदेशीर आहे. हळदीचे पाणी, दूध किंवा चहा रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकते.

पौष्टिक आहे आवळा
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील उत्तम आहे. अर्धा चमचा आवळा पावडर एक चमचा मधासोबत सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास खूप फायदा होतो.

ज्येष्ठमध आहे उत्कृष्ट
ज्येष्ठमधमध्ये बरेच अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्येष्ठमधचा चहा घेतल्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या समस्या कमी होतात.

(टीप : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘टॉप न्युज मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Jayant Patil : ‘जयंत पाटील इकडे येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…

Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी

Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला

Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी

Share This News

Related Post

उन्हाळ्याच्या दिवसांत नारळपाणी फायद्याचे ; काय आहेत फायदे जाणून घ्या

Posted by - April 22, 2022 0
उन्हापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. उष्णतेपासून बचावासाठी विविध प्रकारची शीतपेये घेतली जातात. कार्बोनेटेड पेये, फळांचे रस, आमरस, लस्सी…
Neem Leaves

Neem Leaves : ‘या’ झाडाची पाने, सकाळी रिकाम्या पोटी खा, शुगर पूर्णपणे नष्ट होईल

Posted by - July 9, 2023 0
आजकालच्या वाढत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या आरोग्याच्या (Health) समस्या वाढताना दिसत आहेत. लोकांना पित्त, शुगर आणि बरेच आजार उद्भवतात. त्यातल्या त्यात शुगरचा…

थोड्या कामानंतर लगेच थकवा जाणवतो ? कोणत्याही कामात उत्साह येत नाही… फक्त हा आयुर्वेदिक उपाय करून पहाचं !

Posted by - December 1, 2022 0
HEALTH-WELTH : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक वेळा थोडे काम झाले कि थकवा येतो. वय कोणतेही असुद्या थोड्याश्या कामाने थकवा येणे…

गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा; सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

Posted by - November 15, 2022 0
पुणे : गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात…
Suicidal Thoughts

Suicidal Thoughts : एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत हे कसे ओळखाल?

Posted by - August 5, 2023 0
आजकाल लोक छोट्याशा गोष्टीवरून आत्महत्येसारखे पाऊल (Suicidal Thoughts) उचलत आहेत. सध्या तरुण पिढीमध्ये हे आत्महत्येचे प्रमाण (Suicidal Thoughts) खूप वाढले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *