Suicidal Thoughts

Suicidal Thoughts : एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत हे कसे ओळखाल?

344 0

आजकाल लोक छोट्याशा गोष्टीवरून आत्महत्येसारखे पाऊल (Suicidal Thoughts) उचलत आहेत. सध्या तरुण पिढीमध्ये हे आत्महत्येचे प्रमाण (Suicidal Thoughts) खूप वाढले आहे. प्रत्येक माणूस आज कोणत्या ना कोणत्या कारणाने हतबल झालेला आहे. अशा वेळी अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो आणि ही लोकं टोकाचे पाऊल उचलतात. जगभरात दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात तर त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. एखाद्या व्यक्तीच्या मनात जर सारखेच आत्महत्येचे विचार येत असतील तर त्याला Suicidal ideations म्हणले जाते. मात्र हे विचार येण्याची नेमकी कारणे कोणती ? आणि त्यावर काय उपाय आहेत ते जाणून घेऊया…

एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याची लक्षण कोणती आहेत ?
सतत मृत्यूचा विचार करणे. आपण कोणत्या पद्धतीने आत्महत्या करू शकतो याचा विचार करत राहणं.
मित्र-मैत्रिणी , कुटुंब यांच्यापासून सतत वेगळ राहणं.
अचानकच वागण्यात बदल होणे.
मरण्याविषयी बोलणे , लिहिणे तसेच सारखा तोच विचार करणे.
कायम अस्वस्थ वाटत राहणे
इतरांवर चिडचिड करणे
सततच्या चुकीच्या वागण्यामुळे दारू आणि ड्रगचे प्रमाण वाढते.
ज्या गोष्टीत आनंद वाटत होता, आता त्या गोष्टीत रस नसणं.
भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना.
छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे
सर्वांमध्ये असूनही आपण त्यांच्यामध्ये नाही असे वाटणे

आत्महत्याचे विचार येऊ नयेत म्हणून काय करावे?
व्यायाम, योग, सकस जेवण
नात्यांमध्ये सुसंवाद असावा
एकमेकांच्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा
किमान तीन-चार मित्र/मैत्रिणी असे असावेत, की ज्यांच्याजवळ मनातील भावना व्यक्त करता येतील
आवडत्या व्यक्तीची भेट घ्यावी
स्वतःला वेळ द्या, स्वतःशी बोला
दिवसातून थोडा वेळ स्वतःसोबत घालवा
आपण नक्की काय करतो, कसे वागतो, का वागतो, आपली ध्येय, स्वप्ने, आपली संगत यांचा विचार करा.

Share This News

Related Post

मद्यप्रेमींनो विकेंड आहे ,हँगओवर झाला आहे ? उतरवायचा असेल तर ‘हे’ आहेत प्रभावी घरगुती नुस्खे

Posted by - January 21, 2023 0
पार्टी झाल्यानंतर हँगओव्हर झाला असेल तर अनेक जणांना डोकेदुखी, उलट्या, मळमळ, पोट दुखणे अशा समस्या जाणवतात. विशेष करून वीकेंडला किंवा…

डब्यात रोज पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळलेत ? अगदी पाच मिनिटात बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा

Posted by - October 10, 2022 0
घरी भरून येणारी प्रत्येक गोष्ट ही गृहिणीला खूप आवडत असते. जसे की बाजारातून घरी येताना वेगवेगळ्या भाज्या, किराण्याच्या दुकानातून येणा-या…
Tania Singh

Tania Singh : मॉडेल तानिया सिंहची 28 व्या वर्षी आत्महत्या; ‘हा’ स्टार खेळाडू अडकला वादाच्या भोवऱ्यात

Posted by - February 21, 2024 0
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मधील सनराइजर्स हैदराबादचा खेळाडू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सूरत येथील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहने (Tania…
Marjariasana

Health Tips : पचन क्रिया सुधारण्यासाठी सकाळी नाश्त्याआधी करा ‘हे’ आसन

Posted by - September 3, 2023 0
सकाळी झोपेतून उठलंकीच अनेकदा आपल्याला थकल्यासारखं (Health Tips) वाटत असतं. 7 ते 8 तासांची पूर्ण झोप घेऊनही पूर्ण फ्रेश (Health…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *