Health Tips

Health Tips : झोपेतून उठल्यावर चक्कर येतेय? तर वेळीच सावध व्हा; नाहीतर होऊ शकतात ‘हे’ आजार

958 0

आजची लाइफस्टाइल आणि धकाधकीच्या आयुष्यात माणसाला अनेक आजारांचा (Health Tips) सामना करावा लागतो. अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि चक्कर येणे अशा समस्यांचा (Health Tips) सामना करावा लागतो. मात्र अशक्तपणा आहे असं समजून आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हे दुर्लक्ष करणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. कारण ही लक्षण भयानक आजारांची शक्यता वर्तवतात. त्यामुळं चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. झोपेतून उठल्याबरोबरच अचानक चक्कर येणे यामागे 7 गंभीर आजारांचा धोका असू शकतो. हे आजार घातक ठरु शकतात. त्यामुळं ही लक्षणे हलक्यात न घेता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करा.

अचानक चक्कर का येते?
झोपताना जास्तकरुन रक्ताचा प्रवाह हा पोटाच्या दिशेने असतो. त्यामुळं अचानक उभं राहिल्यानंतर रक्तप्रवास डोक्यापासून पायापर्यंत जातो. ही क्रिया अगदी जलद घडते. त्यामुळं तुमचं डोक गरगरायला लागते किंवा चक्कर येते. म्हणजेच अचानक झोपेतून उठल्यानंतर ब्लड प्रेशर कमी होणं असं आहे. याला ऑर्थोस्टेटिक या पोस्चुरल हायपोटेंशन असं म्हणतात.

अचानक बीपी लो होण्याचे लक्षणे
अंधुक दिसायला लागते
धातीत किंवा खांद्यात वेदना जाणवणे
मन एकाग्र होत नाही
थकवा किंवा अशक्तपणा
डोकेदुखी
हृदयाचे ठोके असमान्य असणे
मळमळणे
गरम होणे किंवा घाम अति प्रमाणात येणे
श्वास फुलणे

‘या’ आजारांचा असू शकतो धोका
व्हिटॅमिन बी 12ची कमतरता किंवा अ‍ॅनिमिया असल्यास अचानक डोके गरगरते
डायरिया, उलटी यामुळं शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होणे
डायबेटीज, थायरॉइडसारखी एंडोक्राइन सारख्या आजारांचा धोका
हृद्याचे ठोके असामान्य होणे
उच्च रक्तदाब, डिप्रेशन यांच्या औषधांचा साइट इफेक्ट
पार्किसन या डिमेंशिया सारखे आजार
गरोदरपणात जाणवणारी अस्वस्थता

डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर उभे राहिल्यानंतर तुम्हाला गरगरल्यासारखे वाटतं असेल तर लगेचच डॉक्टरांसोबत संपर्क करा व त्यांचा सल्ला घ्या. त्यामुळं तुमच्यावर लगेच उपचार करता येतील.

(टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. काही करण्याअगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

Share This News

Related Post

Heart Attack

Heart Attack : हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये नेमका फरक काय?

Posted by - August 16, 2023 0
दिवसेंदिवस आपली बदलती जीवनशैली वाढता ताण तणाव आणि उलट सुलट आहार त्यामुळे आजारही बळावले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे…
Chickenpox New Variant

Chickenpox New Variant : भारतात आढळला कांजण्याचा नवा व्हेरिएंट

Posted by - September 14, 2023 0
कांजण्या (Chickenpox New Variant) हा मुळातच संसर्गजन्य रोग आहे. आपल्यापैकी अनेकांना कांजण्या येऊन गेल्या आहेत. मात्र आता एक चिंताजनक बातमी…
Jaggery Benefits

Jaggery Benefits : हिवाळ्यात गुळ खाल्ल्यामुळे होतात ‘हे’ फायदे; आजारही पळतील दूर

Posted by - December 5, 2023 0
साखरेऐवजी गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अलीकडे गुळात (Jaggery Benefits) असलेले पौष्टिक तत्वे पाहता. साखरेऐवजी गोड पदार्थांमध्ये गुळ वापरला जातो.…
Manohar Joshi

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वस्थामुळे…
High Cholesterol

High Cholesterol : रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलं तर शरीरात दिसू लागतात ‘हे’ 4 बदल

Posted by - August 11, 2023 0
प्रत्येकाची इच्छा असते की, आपण फीट आणि फाईन रहावं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र चुकीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *