Turmeric Water

Turmeric Water : शरीरात वाढलेल्या चरबीवर हळदीचे पाणी ठरते गुणकारी

762 0

सध्याच्या जीवनात सांधेदुखी, कंबरदुखी, अंगदुखीच्या तक्रारी या अनेक वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अशावेळी आपण आयुर्वेदाचेही उपचार घेतो. परंतु या मध्ये हळदीचे पाणी (Turmeric Water) हे या समस्यासाठीच नाही तर इतर समस्यांसाठी (Turmeric Water) सुद्धा ब्रम्हास्त्र ठरू शकते. भारतीय आयुर्वेदामध्ये हळदीला प्रचंड गुणकारी मानले जाते. हळदीचे पाणी प्यायलानं आपल्या शरीरात काय बदल होतो? आणि हे पाणी आपल्यासाठी कसे फायदेशीर ठरते. फक्त सांधेदुखीचं नाही तर शरीरात वाढलेली चरबी आणि चेहऱ्यासाठीही हळदीच्या पाण्याचे सेवन करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तेव्हा हळदीचे पाणी कधी प्यावे, कसे प्यावे आणि दिवसातून किती वेळा प्यावे याबद्दल आपण जाणून घेऊयात

वाढलेले फॅट ही आज मोठी समस्या बनली आहे वाढत फॅट कस कमी करावं ? काय खावं ? काय नाही ? जिम आणि वजन कमी करण्यासाठी खाण्यात येणाऱ्या महागडी औषध या सर्व गोष्टीचा शरीराव आणि मानसिकतेवर भडिमार होतो. परंतु तुम्ही अशावेळी हळदीच्या पाण्याचे अनेक फायदे मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया हळदीच्या पाण्यात नक्की काय गुणधर्म असतात. हळदी हे जंतूनाशक आहे सोबत आपल्या त्वेचेसाठीही ती गुणकारी आहे. त्यातून आपल्याला माहितीच आहे की हळदीनं आपल्याला चांगलाच फायदा होतो परंतु तुम्हाला माहितीये का सांधेदुखी आणि चरबीसाठीही हळदीच्या पाण्याचे चांगलेच फायदे आहेत. चला तर मग काय फायदे आहेत जाणून घेऊयात…

हळदी करक्युमिन इम्युन सिस्टमला अधिक मजबूत करण्यास मदत करते. त्यातून जर तुम्ही हळदीचे पाणी प्यायले तर तुमचा अनेक वाईट बॅक्टेरियांपासून बचाव होतो. त्यामुळे तुम्ही हळदीच्या पाण्याचे सेवन हे दररोज करू शकता.
तुमच्या अंगावरील चरबी कमी करण्यासाठी हळदीचे पाणी हे सर्वाधिक उपायकारक ठरते. हळदीचे पाणी गुणकारी आहे. सोबतच हळदीत गरम आल्याचा रस घातलात तर तुमचे मोठ्या आजारांपासून बचाव करता येतो.
हळदीचे पाणी प्यायल्यानंतर तुमची पचनक्रियाही सुधारते. त्यातून गॅस आणि जळजळीपासूनही तुमचा बचाव होतो.
हळदीच्या पाण्यात एन्टी – इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखीपासूनही तुमचे बचाव करते.
आपल्या त्वचेसाठीही हळदीचे पाणी अत्यंत गुणकारी आहेत.

Share This News

Related Post

मानसिक आरोग्य : पतिपत्नीच्या नात्यामध्ये सातत्याने भांडणे होऊन दुरावा येतोय ? या गोष्टी करून पहा, नक्की फरक जाणवेल

Posted by - February 3, 2023 0
स्वतःला वेळ द्या तुम्ही स्वतः खुश आणि समाधानी असाल तर तुम्ही दुसऱ्याला खुश ठेऊ शकता हे सत्य आहे. १ दिवस…

केवळ 20 सेकंदात हृदयविकाराचे निदान

Posted by - March 15, 2022 0
अमेरिकेत दरवर्षी 12 लाखांपेक्षाही अधिक लोक हृदयविकारामुळे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅन करतात. एमआरआय करवून घेण्यासाठी सध्या 45 ते 90 मिनिटांचा…
Control Diabetes

Health Tips : मधुमेह होण्यापूर्वी ‘हे’ 6 अवयव देतात संकेत; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Posted by - August 18, 2023 0
आजच्या काळात मधुमेह हा एक असा आजार झाला आहे, ज्यामुळे कोट्यवधी लोक त्रस्त आहेत. फक्त भारताची आकडेवारी पाहिली तर 10…

No Smoking Day 2023 : जर तुम्ही धूम्रपानामुळे त्रस्त असाल तर या सोप्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात

Posted by - March 7, 2023 0
देशभरात दरवर्षी 2023 मार्च रोजी ‘नो स्मोकिंग डे’ साजरा केला जातो. धूम्रपानामुळे होणाऱ्या हानीबद्दल लोकांना जागरूक करणे आणि या वाईट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *