Copper Water Side Effects

Copper Water Side Effects : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय?; मग ‘ही’ चूक पडू शकते महागात

943 0

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे (Copper Water Side Effects) हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. तांबे धातू नैसर्गिक जंतुनाशक आहे. त्यामुळं अनोषापोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायाल्याने (Copper Water Side Effects) अनेक आजारांवर आपल्याला नियंत्रण मिळवता येते. मात्र, तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायला तर तुमच्या शरीराचे नुकसानही होऊ शकते. तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे फायदेशीर असल्याचं सिद्ध झाले आहे.

तांब्यांच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात त्याचबरोबर हाडांना बळकटी येते. याचे जसे फायदे आहे तसेच याचे नुकसानदेखील आहे. जर तांब्याची अधिक मात्रा शरीरात गेल्यास कॉपर टॉक्सीसिटी होण्याची शक्यता आहे. यामुळं उलटी होणे, पोटात दुखणे, बद्धकोष्टता अशा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

Diabetes : मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती ठरतील गुणकारक

कॉपर टॉक्सीसिटीच्या साइड इफेक्टमुळं लिव्हर डॅमेज आणि किडणीचा आजारदेखील होऊ शकतो. एका संशोधनानुसार, तांब्याच्या भांड्यात 16 तासांपर्यंत ठेवलेल्या पाण्यात (Copper Water Side Effects) तांब्याची मात्रा कमी प्रमाणात असते. त्यामुळं धातूच्या भांड्यात 16 तास पाणी ठेवल्याने त्यातील बहुतांश बॅक्टेरिया नष्ट झाल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. मात्र त्या पेक्षा जास्त तास तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवले शरीरासाठी घातक ठरु शकते. तज्ज्ञांच्या मते, दररोज 3 कप म्हणजेच 710 एमएल इतक्या प्रमाणात तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचे सेवन करावे. यापेक्षा अधिक सेवन करणे टाळावे. तसंच, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानंतर शक्यतो अर्धा तास दूध किंवा चहा पिऊ नये.

Share This News

Related Post

Health Tips

Health Tips : पायाला मुंग्या आल्या तर चुकूनही करू नका दुर्लक्ष; नाहीतर उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

Posted by - September 20, 2023 0
अनेकदा आपल्याला एका जागेवर बसून पायात मुंग्या येतात. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर ही समस्या (Health Tips) जाणवू लागते. मात्र तुम्हाला…
Ginger

Ginger : आल्याच्या अतिवापराने शरीरात ‘या’ समस्या जाणवू शकतात

Posted by - November 20, 2023 0
हिवाळ्यात गरम गोष्टी हव्याशा वाटतात. कारण या ऋतूत गरम पदार्थ प्यायल्याने शरीरात उष्णता येते. हिवाळ्यात, लोक मुख्यतः आल्याचा (Ginger) चहा…

Lumpy Skin Disease : संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित, लंपी स्कीनला रोखण्यासाठी शासनाचे पाऊल

Posted by - September 9, 2022 0
पुणे : जनावरांमधील लंपी चर्मरोगाचा  वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे  नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास…
Feet

Health Tips : पायाला सूज येतेय..चुकूनही करू नका दुर्लक्ष होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

Posted by - August 26, 2023 0
अनेकदा पायाला वारंवार सूज (Health Tips) येते. बहुतांशीजणांकडून आज-उद्या आराम वाटेल म्हणून अनेकजण आजाराकडे (Health Tips) दुर्लक्ष करतात. मात्र, पायाला…
Setu Bandha Sarvangasana

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Posted by - March 1, 2024 0
सेतू म्हणजे पूल. या आसनात शरीराचा (Setu Bandha Sarvangasana) आकार पुलासारखा दिसतो म्हणून या आसनास सेतुबंधासन असे म्हणतात. हे एक उपयुक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *