राज्यातील अवयवदानाचा टक्का वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

360 0

राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष अभ्यास करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान बाबतच्या राज्य कार्य गटाची बैठक झाली. त्यावेळी  टोपे यांनी सूचना दिल्या आहेत.

मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ साधना तायडे, उपस्थित होते.

सहाय्यक संचालक डॉ. अरुण यादव यांनी प्रथम राज्य कार्य गटाच्या बैठकीबाबत उद्देश सांगितला. राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

अवयवदान चळवळीस व्यापक स्वरूप देण्यासाठी याबाबत लोकांना माहिती, शिक्षण, संवाद या माध्यमातून जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

अवयवदानाबाबत मुंबईतील सायन आणि केईएम रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांचा अभ्यास करावा. वैद्यकीय शिक्षण विभागाने तज्ञ डॉक्टर यांच्याकडून हा अभ्यास करावा, असा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर आहेत. याचबरोबर नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर येथे अशाप्रकारे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी कार्यदलाचे सदस्य डॉ. एस.के. माथूर, डॉ. गुस्ताव दावर, डॉ. राहुल पंडित, डॉ. कपिल झिरपे, डॉ. सुजाता पटवर्धन, डॉ. मंगला गोमारे, डॉ. श्रीरंग बिच्चू, डॉ. संजय कोलते, डॉ. प्रवीण सुर्यवंशी, डॉ. सुजाता अष्टेकर उपस्थित होते.

 

Share This News

Related Post

शाळांच्या वेळेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या ; शिक्षण आयुक्तांच्या सूचना

Posted by - April 9, 2022 0
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याने शाळांच्या वेळेसंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना…

BIG BREAKING : राजीव गांधी हत्येतील दोषी पेरारीवलनची 31 वर्षांनंतर होणार सुटका – सुप्रीम कोर्ट

Posted by - November 11, 2022 0
नवी दिल्ली : राजीव गांधी हत्येतील दोषी ए.जी.पेरारीवलन याची ३१ वर्षांहून अधिक वर्षांची शिक्षा संपवून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तुरुंगातील त्याची…
Eknath Khadse and raksha khadse

Eknath Khadse : सुनबाईपुढे माघार? रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत खडसेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - March 15, 2024 0
रावेर : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 100 उमेदवारांची (Eknath Khadse) यादी जाहीर केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातून अनेपक्षित नावांची…

पुण्यातील स्वारगेट चौकात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Posted by - August 1, 2022 0
पुणे: पुण्यातील स्वारगेट चौकात मागील पाऊण तासापासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. स्वारगेट…
Jalgaon News

Jalgaon News : ड्युटीवरून परतलेल्या वन कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Posted by - October 11, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मुक्ताईनगर येथे वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *