Clove Side Effects

Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम

245 0

भारतीय स्वयंपाकघरात लवंगाचा (Clove Side Effects) वापर जेवणात सुगंध आणि चव आणण्यासाठी केला जातो. लवंगामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मँगनीज यांसारखे पोषक घटक केवळ व्यक्तीचे ओरल हेल्थ चांगले ठेवण्यास मदत करत नाहीत तर पचनक्रिया निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही काही लोकांनी उन्हाळ्यात लवंगाचे जास्त सेवन करू नये. याच्या अतिसेवनामुळे त्यांच्या आरोग्याला नुकसानदेखील होऊ शकते कसे ते जाणून घेऊया…

लो ब्लड शुगर
लवंगाच्या अतिसेवनाने रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि आधीच साखर नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असाल तर लवंग खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

शरीरातील उष्णता वाढवू शकते
लवंगाचा प्रभाव उष्ण असतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. त्याच्या अतिसेवनाने शरीराचे तापमान वाढू शकते. लवंगाचे जास्त सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या, अपचन, अतिसार किंवा जळजळ आणि हार्टबर्न होऊ शकते.

लिव्हर आणि किडनीची समस्या
लवंगाचे जास्त सेवन केल्याने किडनी आणि लिव्हरलाही नुकसान होऊ शकते.जर तुम्हाला यकृत किंवा किडनीच्या आजाराने आधीच त्रास होत असेल तर लवंग जास्त प्रमाणात खाणे टाळा. लवंगाच्या गरम प्रभावामुळे यकृत, मूत्रपिंड आणि पोटाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

ब्लड थिनिंगची समस्या
लवंगाचे जास्त सेवन केल्याने रक्त पातळ होते आणि व्यक्तीला ब्लड थिनिंगची समस्या होऊ शकते. वास्तविक लवंग नैसर्गिक रक्त पातळ करण्याचे काम करते. परंतु जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर दुखापत झाल्यास तुमचा रक्तस्त्राव लवकर थांबणार नाही. इतकंच नाही तर रक्त खूप पातळ होऊ लागलं की इतरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Share This News

Related Post

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यास चांगले, पण…..

Posted by - June 24, 2022 0
पाणी ही शरीरासाठी अत्यावश्यक गोष्ट असते. शिवाय हे पाणी तांब्याच्या भांड्यातून प्यायल्यास त्याचा शरीराल खूप फायदा होतो हे सिद्ध झाले…
Clove

Clove : पोटाची समस्या असेल तर लवंग ठरत आहे गुणकारी

Posted by - November 3, 2023 0
लवंग (Clove) हा सर्वसाधारण मसाल्याचा पदार्थ. हा पदार्थ जवळपास सर्वच जेवणात वापरला जातो. बिर्याणी किंवा कोणताही पदार्थ बनवताना तो स्वादिष्ट…

Food and Drug Administration : आरोग्यास अपायकारक ‘ पफ वनस्पती ’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

Posted by - August 23, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८०…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *