सध्या प्रसिद्ध असलेली ‘चिकनकारी’काय आहे जाणून घ्या

210 0

चिकनकारी हा भरतकामाचा एक उत्तम प्रकार आहे. लखनऊ येथे चिकनकारीचं काम खूप प्रसिद्ध आहे.लखनऊची चिकनकारी म्हणजे अतिशय सूक्ष्म आणि नाजूक भरतकाम म्हणून ओळखली जाते. तेथील वैशिष्ट्य म्हणजे पांढऱ्या कपड्यांवर पांढऱ्याच धाग्याने केलेलं विणकाम. चिकनकारीचे मुख्य दोन प्रकार आहेत.एक म्हणजे ‘कटाव’आणि दुसरा म्हणजे ‘बखिया.’कटाव म्हणजे कापकाम आणि बखिया म्हणजे सूक्ष्म आणि नाजूक टिपकाम.

चिकनकारी ही अत्यंत प्राचीन काळापासून प्रचलित असलेली पारंपारिक कला आहे.असे म्हंटले जाते कि ,नूरजहाँ यांनी चिकनकारी कला ही इराण येथून शिकली आहे आणि तेव्हापासून भारतात ही कला अवगत व्हायला सुरुवात झाली.चिकनकारी साठी चिकनचे कपडे सर्वप्रथम धुऊन 40 डिग्री सेल्सियसवर सुकवले जातात.त्यानंतर शिवणकाम,वेगवेगळ्या डिजाईनचे छापे तयार करून त्यावर धाग्यांनी हाताने विणकाम केलं जाते.

लखनऊ मध्ये चिकनकारी हा व्यवसाय पुरुष जास्त प्रमाणात करताना दिसतात. त्यांच्या कमाईचं मुख्य साधन म्हणजे चिकनकारी.आजकाल चिकनकारी हे भरतकाम खूप प्रसिद्ध झालेले आहे.कुठलाही चित्रपट असो किंवा नाटक त्यामध्ये चिकनकारीचं काम असलेली कुर्ती ,साडी किंवा श्रग आपल्याला अभिनेत्री आणि बाकी कलाकार सुद्दा वापर करताना दिसत आहेत. सुरुवातीला चिकनकारी हे फक्त पांढऱ्याच कपड्यांवर आणि पांढऱ्याच धाग्याने केलेलं बघायला मिळायचे पण आता चिकनकारी वेगवेगळ्या रंगीत कपड्यांमध्ये आणि त्यामध्ये आता छोट्या काचांचा वापर पण होताना दिसत आहे.

चिकनकारी असलेले कपड्यांची थोडी विषेश काळजी घ्यावी लागते कारण ,त्यावरती अतिशय नाजूक असे विणकाम केलं जाते. त्यामुळे ते कपडे सहसा मशीनमध्ये धुणे टाळावे.शक्यतोवर हे कपडे हलक्या हाताने धुवावेत.

Share This News

Related Post

RASHIBHAVISHY

आज आयुष्याचा आनंद घेणार आहात ! मीन राशीसाठी यादगार दिवस ; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - January 16, 2023 0
मेष रास : आज स्वतःच्या मनाला वेळ देणार आहात अर्थात मनशांती मिळवण्यासाठी ध्यानधारणा कराल सायंकाळी मित्रांना भेटायचा मूड होईल आउटडोर…

Boycott Liger trends on Twitter : ‘Self-Made’ स्टारला पाठिंबा न दिल्याबद्दल विजय देवेराकोंडाच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना फटकारले

Posted by - August 20, 2022 0
ट्विटरवर ‘बॉयकॉट लायगर’ हा नवीन ट्रेंड सुरु आहे. विजय देवेराकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बॉलिवूड चित्रपटाला ट्रॉलर्स…

BEAUTY TIPS : पावसाळ्यात पिंपल्स त्रास देत आहेत ? ‘ या ‘ सहज सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नितळ कांती

Posted by - August 19, 2022 0
प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं मग ती कोणत्याही क्षेत्रात असो पण आपली स्किन ही नेहमीच चमकदार आणि नितळ दिसावे असेच…

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना जेल की बेल ; थोड्याच वेळात निर्णय

Posted by - April 9, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल…

तिरुपती बालाजी देवस्थानने प्रथमच जाहीर केली संपत्ती; किती टन सोनं, ठेवी, मालमत्ता ? पाहा

Posted by - November 8, 2022 0
तिरुपती बालाजी : देशभरातील प्रसिद्ध असलेल्या मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचं नाव नेहमीच घेतलं जातं.तिरुमला तिरुपती देवस्थानने प्रथमच खुलासा करत मंदिराची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *