अभिनेत्री पूनम पांडे जिवंत! का पसरवली निधनाची अफवा? समोर आला आहे कारण

949 0

अभिनेत्री पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अचानक, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी, इंस्टाग्रामवर एका पोस्टने पूनम पांडेच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

खुद्द अभिनेत्रीने स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूनम पांडे हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

इंस्टाग्रामवर ‘नशा’ फेम अभिनेत्री पूनम पांडेने म्हटले, ‘तुम्हा सर्वांसोबत काहीतरी महत्त्वपूर्ण शेअर करणे मला भाग पडले – मी येथे आहे, जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर मला झालेला नाही. परंतु दुर्दैवाने, हा आजार कसा टाळायचा? याबद्दल जागृती नसल्याने हजारो महिलांचा यामुळे बळी जात आहे. इतर काही कॅन्सरप्रमाणेच, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य म्हणजे HPV लस आणि लवकर तपासणी चाचण्या करणे. या आजारामुळे कोणाचाही जीव जाणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे. गंभीर जनजागृतीने एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला तो कसा टाळता येईल? याची माहिती दिली जाईल याची खात्री करूया. काय करता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. या आजाराच्या विनाशकारी प्रभावाचा अंत करण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया असं म्हणत #DeathToCervicalCancer हा hashtag वापरला आहे.

Share This News

Related Post

” पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान ” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Posted by - September 3, 2022 0
पुणे : पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा…
Badshah

Badshah : रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणी सायबर सेलकडून होणार चौकशी

Posted by - October 30, 2023 0
प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या (Badshah) फॅन्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बादशाहच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र…
Sajjan Jindal

Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप

Posted by - December 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JSW समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. या…

आमिर खानने आपला मुलगा आझादसोबत घेतला आंबे खाण्याचा मनसोक्त आनंद !

Posted by - April 20, 2022 0
बॉलिवूडमध्ये मि. परफेक्शनिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे असा सुपरस्टार आमिर खानने अलीकडेच आपला मुलगा आझाद बरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला…
Shah Rukh Khan

Don 3 : किंग खानने ‘या’ कारणामुळे नाकारला ‘डॉन 3’ चित्रपट; कारण ऐकून व्हाल थक्क

Posted by - August 10, 2023 0
बॉलीवूडचा बादशहा म्हटलं तर एकच नाव पुढे येत ते म्हणजे शाहरुख खान. शाहरुख ने आपल्या काळात बरेच सुपरहिट चित्रपट केले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *