Bollywood Movie

चित्रपट हे नेहमी शुक्रवारीच का होतात प्रदर्शित ?

640 0

चित्रपट म्हणजे काही लोकांचा जीव कि प्राण. त्यातल्या त्यात आपल्या आवडत्या अभितेत्याचा असेल तर त्याची काही मज्जाच वेगळी. काही लोक तर आपल्या आवडीच्या अभिनेत्याचा चित्रपट असेल तर फर्स्ट डे फस्ट शो चित्रपट वेळात वेळ काढून पाहत असतात. हे चित्रपट प्रेमी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी मूवी बघतातच.मात्र हे शुक्रवार आणि चित्रपट रिलीज होणं यांचं एकमेकांशी नेमकं काय कनेक्शन असावं? कोणताही नवीन चित्रपट शुक्रवारीच रिलीज का होतो ? यामागचे कारण कधी जाणून घेतले आहे का? चला तर मग चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतात जाणून घेऊयात….

शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा भारताची नाहीच. हॉलिवूडमध्ये प्रथम शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड, ‘गॉन विथ द विंड’ या लोकप्रिय चित्रपटापासून आला. हा चित्रपट 15 डिसेंबर 1939 रोजी प्रदर्शित झाला आणि तूफान चालला. बॉक्स ऑफीसवरचे त्याचे यश बघता सर्व हॉलिवूडपट शुक्रवारी प्रदर्शित होऊ लागले. 1960 पूर्वी भारतात चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी कोणताही निश्चित दिवस नव्हता. यादरम्यान 1960 मध्ये ‘मुघल-ए-आझम’ हा ऐतिहासिक चित्रपट 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. 5 ऑगस्ट 1960 या दिवशी शुक्रवार होता. या चित्रपटाने बरेच यश कमावले. केवळ भारतातच नाही तर जगभरात याची चर्चा झाली.मुगल-ए-आजमला मिळालेले यश पाहता नवीन चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची पद्धत सुरु झाली. त्यातल्यात्यात स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे भारतात बहुतांश लोकांकडे रंगीत टीव्ही नव्हता. त्यामुळे लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत होते. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी अर्ध्या दिवसानंतर सुट्टी दिली जात होती. जेणेकरून तेही कुटुंबासोबत चित्रपट पाहू शकतील आणि हे चित्रपटाच्या कलेक्शननुसारही चांगला मानले जात होते.

तर दुसरीकडे भारतात शुक्रवार म्हणजे देवी लक्ष्मीचा वार मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली, तर धनलाभ होतो, अशी सर्वसामान्य भावना आहे. हीच भावना चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांचीही असते. चित्रपटावर देवी लक्ष्मीचा वरदास्त असल्यास चित्रपट सुपरहिट होऊन बक्कळ कमाई होईल, ही त्यामागची भावना असते.

ह्याचे अजून एक कारण म्हणजे विकेंड शुक्रवार हा आठवड्याचा शेवटचा वर्किंग डे मानला जातो. तर शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असतात. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतेक लोक त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह शुक्रवारी रात्री किंवा शनिवार, रविवारी चित्रपट पाहण्यासाठी जातात. यामुळे एखाद्या चित्रपटाचे कलेक्शन चांगले होते, तसेच यातून चित्रपटाचे यश-अपयशही ठरले जाते. मात्र, सर्वच चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित होतात, असे नाही. हा ट्रेंड मोडून अनेक चित्रपट निर्मात्यांनी वेगवेगळ्या दिवशीही चित्रपट प्रदर्शित केले आणि त्यांना यशही मिळाले आहे. पण विशेषत: बॉलिवूडमध्ये शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्याचा ट्रेंड अद्यापही फॉलो केला जातो.

Share This News

Related Post

Ruby Tandon

Ruby Tandon : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी निघाली बोगस डॉक्टर; वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अमित टंडन (Actor Amit Tandon) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमित टंडन याची पत्नी…

दीपिका रणवीरच्या घरी नवा पाहुणा येणार, बाळाचे नाव काय ठेवणार ?

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- बॉलिवूडमधील मोस्ट स्वीट कपल म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दोघेही एकमेकांविषयी नेहमी…
National Film Awards

National Film Awards : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री

Posted by - August 24, 2023 0
मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराला (National Film Awards) आज सायंकाळी 5 वाजता सुरुवात झाली आहे.…
Pravin Tarde

Pravin Tarde : यंदाचा ‘फकिरा पुरस्कार’ अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना जाहीर

Posted by - August 23, 2023 0
पुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…

LIGER : विजय-अनन्याचा sensational performance पाहिलात का ? तरुणाईमध्ये ‘आफत’ या रोमँटिक गाण्याची क्रेझ

Posted by - August 6, 2022 0
LIGER : लायगर या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली तर आहेच , अशातच या चित्रपटातील अकडी-पक्की , वाट लगा देंगे ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *