Veteran Artists Pass Away In 2023

Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

639 0

मुंबई : 2023 हे वर्ष मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणात निराशाजनक गेले आहे.अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे ते पाहूया…

1) सुलोचना लाटकर (30 जुलै 1928 ते 4 जून 2023)
4 जून रोजी, सुलोचना दीदी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुलोचना दीदी या मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमधील त्यांच्या योगदानासाठी ओळखल्या जात होत्या.

2) रवींद्र महाजनी (7 ऑक्टोबर1949 ते 14 जुलै 2023)
यावर्षी 14 जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले.ते 77 वर्षांचे होते. त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मराठी चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणाऱ्या या कलाकाराचा मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक होता.

3) सीमा देव​ (27 मार्च 1942 ते 24 ऑगस्ट 2023)
24 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 80 हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

4) मिलिंद सफई​
25 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान झाले. मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील प्रभावी भूमिकांसाठी ते ओळखले जायचे.

5) रवींद्र बेर्डे (15 ऑक्टोबर 1945 ते 13 डिसेंबर 2023)
दिग्गज अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे 13 डिसेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात 300 पेक्षा अधिक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

6) दिनेश फडणीस ( 2 नोव्हेंबर 1966 ते 5 डिसेंबर 2023)
अभिनेते दिनेश फडणीस यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी ‘सीआयडी’ या लोकप्रिय क्राईम थ्रिलर शोमधील ‘फ्रेड्रिक्स’ची भूमिका अजरामर केली होती.

7) सतीश कौशिक (13 एप्रिल 1956 ते 9 मार्च 2023)
बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मिस्टर इंडिया चित्रपटातील कॅलेंडर ही भूमिका अजरामर केली.

8) देव कोहली ( 2 नोव्हेंबर 1942 ते 26 ऑगस्ट 2023)
ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी लिहिली आहेत. यामध्ये ‘कबूतर जा जा’, ‘आज शाम होने आयी’,’चलती है क्या नौ से बारह’,’ओ साकी साकी’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे.

9) ज्युनियर मेहमूद (15 नोव्हेंबर 1956 ते 8 डिसेंबर 2023)
अभिनेते नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद यांचे 8 डिसेंबर रोजी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. ज्युनियर मेहमूद हे पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

10) नितीन देसाई (9 ऑगस्ट 1965 ते 2 ऑगस्ट 2023)
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे २ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ते 58 वर्षांचे होते. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतले खूप मोठे नाव होते. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.

Share This News

Related Post

Adv. Yashwant Jamadar

Adv. Yashwant Jamadar : ‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न 

Posted by - January 29, 2024 0
पुणे : आयोध्येत श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त  साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात…
Reels

तुम्ही रील्स पाहण्यासाठी बराच वेळ घालवता का? मग आताच व्हा सावध; नाहीतर होईल ‘हा’ आजार

Posted by - June 10, 2023 0
पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी टीव्हीवर चित्रपट पाहणे, सीरियल पाहणे आणि रेडिओवर गाणी ऐकणे या गोष्टी केल्या जात होत्या. मात्र या गोष्टी…

युक्रेन रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावला अभिनेता सोनू सूद

Posted by - March 5, 2022 0
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध पाहता जग सध्या चिंतेत आहे. परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता, अनेकांना युद्धाच्या काळात देशात अडकलेल्या…

#BHOLA : भोला ट्रेलरमुळे लोकांमध्ये उत्साह, प्रदर्शनापूर्वीच म्हणतायत पठाणपेक्षा चांगला चित्रपट असणार …पहा ट्रेलर

Posted by - March 6, 2023 0
अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘भोला’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरप्रमाणेच चित्रपटाच्या ट्रेलरनेही प्रेक्षकांना भुरळ घातली. भोलाचे अॅक्शन सीन्स,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *