Veer Savarkar, Secret Files : ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ

652 0

पुणे :‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ (Veer Savarkar, Secret Files) या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे,प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर सिद्धार्थ तातूसकर,कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.

दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले,” सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे असे आम्हाला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

सावरकर यांचे जीवन हा जवळपास 100 वर्षांचा इतिहास आहे. यातून लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते. सावरकर जन्मतः नेते होते. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे. सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

पुढे बोलताना सोमण म्हणाले की, आजपर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले परंतु वेब सीरिजच्या माध्यमात प्रथमच ही मालिका समोर येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर हिंदी भाषेतील चार सीझनमध्ये ही वेबसिरीज असणार आहे. पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे 1883 ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येणार आहे.

डॉ. अनिर्बान सरकार म्हणाले, ” सावरकर हे जन्मतः क्रांतिकारी होते. त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्व समाजासमोर येण्याची गरज होती. कारण सेल्युलर जेल, कोलू ओढला, त्यांनी बोटीतून मारलेली उडी एवढेच लोकांना माहित आहे. मात्र स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान, त्यांनी केलेला त्याग यांच्याबद्दलचे वास्तव कुणालाच माहिती नाही. त्यांचे जीवनकार्य संपूर्ण देशाला माहित व्हावे यासाठी हिंदी भाषेत ही वेबसिरीज समोर आणणार आहोत. लोकांनी या वेब सीरिजला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सावरकर समजून घ्यावेत अशी अपेक्षा आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारित कलाकृती सादर करावी हे माझे स्वप्न होते, ते या वेब सीरिजच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे”

Share This News

Related Post

मेरा पती सिर्फ मेरा है म्हणत सीमा हैदरनं शेजारणीला दाखवला जोरदार इंगा

Posted by - August 19, 2023 0
पाकिस्तानि सीमा हैदरचा शेजारणीशी सोबत जोरदार राडा. सध्या जोरदार चर्चेत असणारी आणि भारतात बेकायदशीररित्या प्रवेश घेणारी सीमा गुलाम हैदर आता…
garder callopesd

पुण्यातील वाकडेवाडीत 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला; परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Posted by - May 8, 2023 0
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या वाकडेवाडी परिसरात आज सकाळी 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला आहे. यामुळे त्या ठिकाणी असलेल्या…

ससून हॉस्पिटल ड्रग्सप्रकरणी पुणे पोलिसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - October 6, 2023 0
ससून ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे. यामध्ये ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं पुणे…
DRDO

Pradeep Kurulkar : हनीट्रॅप प्रकरणात DRDO कडून घडली ‘ही’ मोठी चूक

Posted by - June 28, 2023 0
पुणे : पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *