TV Actor Bhupinder Singh

TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार

649 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्युनिअर अभिनेत्याने (TV Actor Bhupinder Singh) दिवसाढवळ्या कुटुंबावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये अभिनेत्याकडून एकाच कुटुंबातील 4 सदस्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मनोरंजन सृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बिजनौर येथील बढापूर कुआ खेडा गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी दुपारी टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंह याचा शेताच्या टोकाशी असणाऱ्या झाडावरुन गोविंद सिंह नावाच्या व्यक्तीशी वाद झाला. यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका वाढला की, भूपेंद्र सिंहने रागाच्या भरात गोळीबाराचा आवाज ऐकताच गोविंद सिंह यांचं कुटुंबीय त्यांच्या मदतीसाठी धावलं. पण भूपेंद्र सिंहने त्यांनाही सोडलं नाही आणि त्यांच्यावरही गोळीबार सुरु केला.

या गोळीबारात गोविंद सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर 3 सदस्य गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणी भूपेंद्र सिंह याच्यासह आणखी तिघांना अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. भूपेंद्र सिंह यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी मधुबाला एक इश्‍क एक जुनून, काला टीका, कार्तिक पूर्णिमा आणि एक हसीना या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

Share This News

Related Post

Buldhana News

Buldhana News : दुचाकी चालवताना हार्ट अटॅक आल्याने भाजपच्या ‘या’ नेत्याचा मृत्यू

Posted by - August 25, 2023 0
बुलढाणा: भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा (Buldhana News) जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख यांचे हार्ट अटॅकने निधन झालं आहे. ते 56 वर्षांचे…
Utter Pradesh Crime

देव तारी त्याला कोण मारी ! गाडीचे चाक अंगावरून जाऊनदेखील चिमुकलीचा वाचला जीव

Posted by - May 29, 2023 0
मुंबई : आपण सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहत असतो. सध्या एका चिमुकलीच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर…

CRIME NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ; आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल

Posted by - November 14, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ करून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्वर…

माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

Posted by - June 4, 2022 0
पुणे- अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या…
Palghar News

Palghar News : 17 विद्यार्थिनीसाठी पाणी ठरलं विष; ‘ती’ चूक पडली महागात

Posted by - February 29, 2024 0
पालघर : पालघरमधून (Palghar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी पाणी पिताना एक चूक केली आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *