Adah Sharma

Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात; ट्विटरद्वारे दिली माहिती

757 0

मुबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिने या चित्रपटात केल्या अभिनयामुळे सर्वत्र तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. यादरम्यान अभिनेत्री अदा शर्मा हीचा अपघात झाला आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) आणि अभिनेत्री अदा शर्मा 14 मे रोजी एका हिंदू यात्रेत सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात असताना हा अपघात झाला.

अदा शर्माने दिली हेल्थ अपडेट
अदा शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. तिने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. “मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघातासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद”. असे ट्विट तिने केले आहे.

‘द केरळ स्टोरी’ने पार केला 100 कोटींचा आकडा
अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमाने शनिवारी 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 2023 मधील हा चौथा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींचा आकडा गाठला आहे. सुदिप्तो सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विपुल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Share This News

Related Post

Pune Don News

Pune News : डॉन साठी पुणेकर ढसढसा रडले, लॅम्बोर्गिनी कारच्या धडकेत मृत्यू पावलेल्या ‘डॉन’ची इमोशनल INSIDE STORY

Posted by - August 14, 2023 0
पुणे : डॉन…..पुण्यातील प्रसिद्ध अशा गुडलक चौकातील सगळ्यांचा तो लाडका होता. या भागात त्याचे अनेक ओळखीचे, जीवाभावाचे मित्र झाले होते.…
Nilkanth Jewellers

Nilkanth Jewellers : पुण्यात निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाकडून कारवाई

Posted by - October 19, 2023 0
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सवर (Nilkanth Jewellers) आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. पत्र्या मारुती चौक येथील सराफी दालनावर आयकर विभागाची…
Old People

Property News : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून बेदखल करणार; ‘या’ गावाने घेतला मोठा निर्णय

Posted by - January 29, 2024 0
सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात…

पुणे :स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने आनंदोत्सव

Posted by - December 1, 2022 0
पुणे : दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा विभाग ३ डिसेंबरपासून…

‘ही मॅन’ धर्मेंद्र यांनी आपल्या चुकीमधून काय दिला संदेश ? पाहा (व्हिडिओ)

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. मग तो व्यायाम असला तरीही. आपल्या आवाक्यापेक्षा अति व्यायाम करणे बऱ्याचदा हानिकारक ठरते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *