The Kerala Story

‘The Kerala Story’ : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला “OTT”वर खरेदीदार मिळेना

406 0

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ (‘The Kerala Story’) हा चित्रपट प्रदर्शना पुर्वीच वादात अडकला होता. या वादातच हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला (‘The Kerala Story’) रिलीजनंतर वादाच्या आणि पाठिंब्याच्या मालिकेत ” द केरळ स्टोरी” चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 238.42 कोटींची कमाई केली. हा चित्रपट केवळ 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

हिंदू मुलाशी मैत्री केली म्हणून भर बाजारात जमावाचे मुस्लीम मुलींशी गैरवर्तन (Video)

अलीकडेच “द केरळ स्टोरी” (‘The Kerala Story’) हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी माध्यमांशी बोलतांना एक धक्कादायक खुलासा केला आहे. चित्रपटसृष्टीत “द केरळ स्टोरी” या चित्रपटाविरोधात एक टोळी तयार झाली असून, त्यामुळे “द केरळ स्टोरी” चित्रपटाला ओटीटीवर खरेदीदार आणि चांगली डील मिळत नसल्याने सुदीप्तो सेन निराश झाले आहेत.

“द केरळ स्टोरी” (‘The Kerala Story’) हा चित्रपट केरळमधील काही महिलांची कथा सांगतो. ज्यांचा विश्वासघात करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास आणि नंतर ISIS मध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाते. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Share This News

Related Post

Casting Vibe : प्रादेशिक कलाकारांना मनोरंजन क्षेत्रात पदार्पण देणारे नवीन व्यासपीठ !

Posted by - October 15, 2022 0
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर टीव्ही आणि ओटीटी माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. भारत…
Rinku Rajguru

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Posted by - March 4, 2024 0
मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरुला (Rinku Rajguru) नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. सिनेमाचं शुटींग नसेल…

” पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान ” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Posted by - September 3, 2022 0
पुणे : पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा…
Gautami Patil

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पत्रकारांना मारहाण

Posted by - May 17, 2023 0
नाशिक : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. आपल्या नृत्याच्या जोरावर…

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटानं केली 116 कोटींची कमाई

Posted by - March 19, 2022 0
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.  चित्रपट पाहून लोकांच्या डोळ्यातील अश्रू आवरता येत नाहीत,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *