Tamannaah Bhatia

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

1029 0

मुंबई : साऊथ तसेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (Tamannaah Bhatia) अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तमन्ना पोलिसांच्या कचाट्यात सापडली असून तिला महाराष्ट्र साइबर क्राइमकडून समन्स बजावण्यात आले आहेत.तमन्नाला 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. आता हे प्रकरण नेमके काय आहे? तमन्नाला समन्स का बजावण्यात आले? त्याबद्दल जाणून घेऊयात…

फेअरप्ले ॲपवर आयपीएल 2023 च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगच्या संदर्भात महाराष्ट्र सायबरने तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यासंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहेत. तमन्नाला 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.तमन्ना भाटियाबरोबरच अभिनेता संजय दत्त यालाही 23 एप्रिल रोजी महाराष्ट्र साइबर क्राइमकडून समन्स बजावण्यात आले होते. मात्र संजय दत्त त्यावेळी हजर राहू शकला नाही. आपला जबाब नोंदवण्यासाठी संजय दत्तनं वेळ आणि तारीख मागितलं होती. ज्या दिवशी समन्स बजावण्यात आले त्यादिवशी संजय दत्त भारतात नव्हता.

IPL मॅचच्या स्ट्रीमिंगसाठी बौद्धिक संपदा अधिकार असल्याची तक्रार वायकॉम 18नं सप्टेंबर 2023मध्ये दाखल केली होती.फेअर प्ले प्लॅटफॉर्म या बेटिंग एँपवर बेकायदेशीरपणे मॅच स्ट्रिमिंग करण्यात आली. ज्यामुळे वायकॉम 18ला 100 कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं होत. या प्रकरणात तमन्ना भाटिया आणि संजय दत्त यांच्यासह बादशाह, जॅकलिन फर्नांडिस यांचादेखील समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

New Rules from 1st October

New Rules from 1st October : 1 ऑक्टोबरपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल; तुमच्या खिशाला लागणार कात्री

Posted by - September 30, 2023 0
मुंबई : प्रत्येक महिन्याची एक तारीख खास असते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून (New Rules from 1st October) नवीन नियम लागू…

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा वाढ, २० मे पर्यंत मुक्काम कोठडीत

Posted by - May 6, 2022 0
मुंबई- मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज…

घरातच वेश्याव्यवसाय सुरु, माजी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग

Posted by - April 6, 2023 0
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील श्रीनगर भागातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून घरात सुरु…

Cold Blooded Murder :बॅग घेऊन जात असतानाचा आफताबचा तो व्हिडिओ व्हायरल; त्या बॅग मध्ये…. पहा व्हिडिओ

Posted by - November 19, 2022 0
नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब याने तिचे 36 तुकडे केले. तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट…
Pune News

Pune News : पुणे पोलिसांनी गुडलक कॅफेजवळ पाच कोटीं किंमतीची व्हेल माशाची उलटी केली जप्त

Posted by - September 3, 2023 0
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune News) घटनांमध्ये रोज वाढ होताना दिसत आहे. आज पुणे पोलिसांनी (Pune News) मोठी कारवाई करत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *