Sunny Deol

Sunny Deol : भाजपा खासदार सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव रद्द ! बँकेने दिले ‘हे’ कारण

530 0

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) एकीकडे त्याच्या ‘गदर 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे सनी देओल (Sunny Deol) चर्चेत येण्याचं कारण हे त्याच्या मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या बंगल्याचा लिलाव. सनी व्हिलाचा लिलाव होणार होता. पण 24 तासात हा लिलाव थांबवण्यात आला आहे.

20 ऑगस्ट रोजी सगळ्यांना माहिती मिळाली होती ती बॅंक ऑफ बडोदानं सनी देओलला नोटिस पाठवत त्याचा सनी व्हिला या बंगल्याचा लिलाव करणार असल्याचे सांगितले होते. सनी देओलवर 56 कोटींचं कर्ज होतं आणि त्या कर्जाची परतफेड सनी देओल करू शकला नाही. त्यामुळे त्याचा बंगला हा लिलावासाठी काढण्यात आला. त्याच्या या बंगल्याच्या लिलावाची तारिख देखील जाहीर करण्यात आली होती. हा लिलाव 25 सप्टेंबर रोजी पार पडणार होता. मात्र आज समोर आलेल्या माहितीनुसार बँक ऑफ बरोदानं हा लिलाव थांबवला आहे.

बँकेने लिलावाच्या जाहिरातीत काय म्हंटले होते?
बॅंकेनं जाहिरातीत म्हटलं होते कि, 25 सप्टेंबर रोजी सनी व्हिलाचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी प्रॉपर्टीची किंमत ही 51.43 कोटी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर या किंमतीवरून पुढे हा लिलाव होणार आहे.

सनी देओलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचा ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. सनी देओलची तारा सिंग ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. या चित्रपटानं 10 दिवसात बॉक्स ऑफिसवर जवळपास 377 कोटींची कमाई केली आहे. यामुळे हा चित्रपट लवकरच 400 कोटींचा टप्पा पार करेल.

Share This News

Related Post

Navneet Kaur Rana

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

Posted by - April 3, 2024 0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होत व अशातच भाजपकडून खासदार नवनीत…
Joe Lindner Pass Away

Joe Lindner Pass Away : बॉडीबिल्डर जो लिंडनरचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन

Posted by - July 2, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूट्यूबच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला बॉडीबिल्डर जो लिंडनर याचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन (Joe Lindner…

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Posted by - April 15, 2024 0
मुंबई : रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी आरोपींनी…

NITIN GADAKARI : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन ते तीन दिवसांत पाडणार

Posted by - September 2, 2022 0
पुणे : चांदणी चौक भागात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामाना नागरिकांना करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. याच वाहतूक कोंडीमुळे राज्याचे…

“जग्गू आणि जुलिएट” चा कलरफुल ट्रेलर रिलीज : अमेयचा जग्गू आणि वैदेहीची जुलिएट करणार उत्तराखंडात धमाल

Posted by - January 25, 2023 0
पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची चर्चा त्याचं मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासूनच झाली होती. त्यानंतर आलेल्या टीझरने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *