Gadar 2 Teaser

Gadar 2: सनी देओलच्या ‘गदर 2’वर सेन्सॉर बोर्डाने फिरवली कात्री; चित्रपटात ‘हे’ बदल करण्याचे दिले निर्देश

376 0

बॉलिवूड अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री आमिषा पटेल यांचा बहुचर्चित चित्रपट ‘गदर 2’ (Gadar 2) गदर: एक प्रेम कथा या 2001 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिक्वेल आहे. गदर: एक प्रेम कथा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता ‘गदर 2’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र हा चित्रपट रिलीज होण्याआधी सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात काही बदल करण्याचे निर्देश चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत. चला तर मग सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात कोणते बदल सुचवले आहेत चला पाहूया….

1) ‘गदर 2’ मधील दंगलीच्या सीनदरम्यान दंगलखोरांनी दिलेल्या ‘हर हर महादेव’च्या घोषणा चित्रपटातून काढून टाकण्यात आल्या असून
चित्रपटाच्या सबटायटलमध्ये देखील या घोषणांना स्थान देण्यात आलेले नाही.
2) ‘गदर 2’ चित्रपटात ‘तिरंगा’ ऐवजी ‘झंडे’ हा शब्द वापरण्यास सेन्सॉर बोर्डानं चित्रपटात निर्मात्यांना सांगितलं आहे. ‘हर झंडे को… में रंग देंगे’. असा डायलॉग या चित्रपटामध्ये ऐकू येणार आहे.
3) ‘गदर 2’ चित्रपटाच्या एका सीनमध्ये ठुमरी गायलेली दाखवण्यात आली आहे, ज्याचे बोल असे आहेत – ‘बता दे सखी… गये शाम’… जे आता ‘बता दे पिया कहां बिताई शाम…’ असे करण्यात आले आहेत.
4) कुराण आणि गीतेच्या संदर्भात चित्रपटात एक डायलॉग आहे जो पुढीलप्रमाणे आहे – ‘दोनों एक ही तो हैं, बाबा नानक जी ने भी यही कहा है’. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार आता हा डायलॉग बदलून ‘एक नूर ते सब उपाजे, बाबा नानक जी ने भी यही कहा है’ असा करण्यात आला आहे.
5) सेन्सॉर बोर्डाने ‘गदर 2’ च्या शेवटी हिंसाचार आणि रक्तपाताच्या दृश्यांदरम्यान ‘शिव तांडव’ मधील श्लोक आणि शिव मंत्रांचा जप बदलला आहे. या सीन्सच्या बॅकग्राउंडला संगीत वाजण्यास परवानगी दिली आहे.
6) सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटात वापरण्यात आलेल्या सर्व श्लोक आणि मंत्रांच्या अनुवादाच्या प्रती जमा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
7) ‘गदर 2’ मध्ये 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमधील युद्धाच्या संदर्भात अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, ज्याबाबत सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
8) चित्रपटात ‘बास्टर्ड’ शब्दाच्या जागी ‘इडियट’ हा शब्द टाकण्यात आला आहे.
9) चित्रपट सुरू होण्यापूर्वी स्क्रीनवर दाखवण्यात येणारे डिस्क्लेमर बदलण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या आहेत.
10) ‘गदर 2’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र दिले आहे.

कधी रिलीज होणार गदर 2?
‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल हे दोघे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘गदर 2’ हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट गदरचा सिक्वेल असणार आहे.

Share This News

Related Post

Waheeda Rehman

Waheeda Rehman : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Posted by - September 26, 2023 0
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री…

Met Gala 2022 मध्ये नताशाचा गोल्डन लूक, नताशा आहेत अदार पूनावाला यांच्या पत्नी

Posted by - May 4, 2022 0
फॅशनचा सर्वात मोठा कार्यक्रम असलेला Met Gala 2022 सुरू झाला आहे. भारतीय सोशलाइट आणि व्यावसायिक महिला नताशा पूनावाला यांनी मेट…
Mallika Rajput

Suicide News : धक्कादायक! कंगनासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Posted by - February 13, 2024 0
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत हिने तिच्या सुलतानपूर…

अनंत अंबानीचे पुन्हा एवढे वजन कसे वाढले ? स्वतः आई नीता अंबानी यांनी सांगितले ‘हे’ कारण !

Posted by - January 28, 2023 0
मुंबई : सध्या अनंत अंबानी यांच्या साखरपुड्यातील फोटोंमुळे ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. पण यावेळी ते त्यांच्या अति स्थूलपणामुळे…
LokSabha

LokSabha : उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! ‘या’ अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

Posted by - March 3, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा (LokSabha) निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा निर्धार भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपाने उमेदवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *