Sayaji Shinde

Sayaji Shinde : आपल्या आईला निरंतर जिवंत ठेवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदें यांनी लढवली ‘ही’ अनोखी शक्कल

637 0

मुंबई : आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी… आपले आईवडील आपल्याला घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असतात. आपण कितीही मोठे झालो तरी त्यांचे ऋण आपल्या फेडता नाही येत. त्यामुळे मराठमोळे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आपली आई सदैव जिवंत राहावी म्हणून त्यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. सयाजी शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना मुगुटराव शिंदे यांचे वयाच्या 97 व्या वर्षी 27 एप्रिल 2018 रोजी निधन झाले. सयाजी शिंदे यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते. आपल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी एक अनोखी शक्कल लढवली. त्यामुळे तुम्हीही त्यांचे कौतुक कराल…

सयाजी यांनी आपल्या आईला 500 वर्ष जिवंत ठेवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे आणि त्यामुळे त्यांची आई 500 वर्ष जगणारही आहे. सयाजी यांनी असं काय केलंय ज्यामुळे त्यांची आई 500 वर्ष जिवंत राहणार आहे, हे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं. सयाजी यांनी आपल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या वजनाइतक्या बिया लावण्याचा निर्धार केला आहे. एका कार्यक्रमात आईबद्दल बोलताना सयाजी म्हणाले, ‘माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. प्रत्येकाला वाटतं त्याची आई खूप जगावी. माझी आई मला आयुष्यात कायम जिवंत राहायला हवीये जीपर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत. मग ती कशी राहील?

मग त्यांनी निर्धार केला केला कि, सयाजी शिंदे हे आपल्या आईच्या वजनाइतक्या देशी झाडांच्या बिया संपूर्ण महाराष्ट्रभर लावतील. म्हणजे मग त्या झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात, त्या झाडांच्या फळामध्ये,सावलीत माझी आई कायम राहील. पुढे त्यांनी म्हटलं, ‘झाडं लावायचं मी काही सामाजिक काम करत नाही. मला आवड आहे ती आणि आईला मी वचन दिलंय तुझ्या वजनाएवढ्या बिया लावेन म्हणून मी ते काम करतो. मला वाटतं प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं ऋण फेडायचं असेल तर माता आणि धरतीमाता यांच्याइतकी मोठी गोष्ट जगात नाही. तेवढं आपण सांभाळलं तर बस आहे. अभिनेते सयाजी शिंदें यांचे आपल्या आईवरील प्रेम बघून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल…

Share This News

Related Post

Actress Tanuja Hospitalised

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Posted by - December 18, 2023 0
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Actress Tanuja Hospitalised) यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल…

#FRAUD : ऐश्वर्या, दीपिका, आलिया, ह्रितिक अशा दिग्गज बॉलीवूड स्टार्सच्या नावाने क्रेडिट कार्ड बनवून बँकेला लाखोंचा चुना; 98 सेलिब्रिटींची नावे आली समोर; वाचा काय आहे प्रकरण…

Posted by - March 4, 2023 0
मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटींच्या नावानं फेक क्रेडिट कार्ड बनवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये ऐश्वर्या…
Jee Karda

मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपची भन्नाट गोष्ट सांगणारा ‘जी करदा’ चा ट्रेलर रिलीज

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) हीने तिच्या स्टाईलने आणि अभिनयाने सगळ्यांची मने…

#BOLLYWOOD : मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 18, 2023 0
मुंबई : सिनेविश्वातून पुन्हा एकदा वाईट बातमी समोर येत आहे. मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56…

ऑस्करसाठी भारताकडून ‘या’ चित्रपटाची अधिकृत एन्ट्री ; RRR आणि द काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट शर्यतीतून बाहेर

Posted by - September 20, 2022 0
ऑस्करसाठी भारतातून यंदा RRR आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपट शर्यतीत होते. या दोन्ही चित्रपटांची ऑस्करसाठी जोरदार चर्चा होत असतानाच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *